तळवली हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के शंभर टक्के निकालाची पंरपरा कायम
तळवली (मंगेश जाधव)
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली,ता.गुहागर जि.रत्नागिरी या कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून सुयश प्राप्त विद्यार्थ्यांचे परिसरातून अभिनंदन केले जात आहे.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून येथील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा यावेळीही कायम राखली आहे.त्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी, तळवली गटविकास मंडळ व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी सुयश प्राप्त विद्यार्थी, सर्व मार्गदर्शक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार सर यांचे अभिनंदन केले आहे. तसेच तळवली सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या सुयशाबद्दल परिसरातूनही सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.