१००% निकालाची परंपरा कायम : जैतापूर एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांचा यशाचा डंका
घाडी विराज व डोर्लैकर चिंतन अव्वल, चार गुणवंतांना रोख पारितोषिक
✍️राजू सागवेकर | राजापूर
जैतापूर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय, जैतापूर या शाळेने इयत्ता १० वीचा निकाल (शैक्षणिक वर्ष 2024-25) तब्बल १००% लागवून यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
या घवघवीत यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापिका सौ. नारे मॅडम यांचे संस्थेच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले.
या परीक्षेत घाडी विराज सुनिल व डोर्लैकर चिंतन सुधाकर यांनी ८०% गुण मिळवून संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. मोर्यै चेतन सचिन (७९.४०%) आणि सागवेकर सामिया आयुब (७३.८०%) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.
या चारही गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अशोक करगुटकर यांनी प्रत्येकी ५००/- रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करून त्यांच्या मेहनतीला दाद दिली.
शाळेच्या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत व पालकांचे सहकार्य मोलाचे ठरले. या उल्लेखनीय निकालाबद्दल संपूर्ण जैतापूर पंचक्रोशीतून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संस्थेच्या व पालकवर्गाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
—
#JaitapurSchool #SSCResult2025 #100PercentResult #RajapurNews #विद्यार्थ्यांचा_गौरव #RatnagiriEducation #ShikshanYash
फोट