गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित,
खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल,व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल गोवळकोट या विद्यालयाचे घवघवीत यश.
🔸१००% निकालाची परंपरा कायम
चिपळूण -(योगेश पेढांबकर)
गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित,खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल,व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल ल गोवळकोट या विद्यालयाचने घवघवीत यश संपादन केले आहे.
निकालाची परंपरा कायम ठेवण्यात कायम विद्यालय यशस्वी झाले आहे.सुयोग्य नियोजन, अचूकता व सातत्यापूर्ण अभ्यासक्रमामुळे सदर यश संपादन झाले आहे. विद्यार्थांनी सातत्याने केलेली मेहनत, शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन, व प्राचार्य यांचे उत्तम व्यवस्थापन व पालकांच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाले आहे.
१) कु.इरम अफजल घारे
९५.४० टक्के
२) कु.झीनत फिरोज म्हमदुले
९३.०० टक्के
३) कु.मोहम्मद साद सरफराज गोठे
९१.०० टक्के
४) कु. ओमेमा रफिक अहमद ढेनकर
९०.४० टक्के
५) कु. हुदा अ.मन्नान इनामदार
९०.०० टक्के
असे अनुक्रमे गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयात विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मध्ये एकूण २७ विद्यार्थी ,प्रथम श्रेणी मध्ये १२ ,व द्वितीय श्रेणी मध्ये ६ विद्यार्थी यांनी यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल *संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ.श्री. इसहाक खतीब, व्हा.चेअरमन श्री.जफर कटमाले ,संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. उरुसा खतीब,संस्थेचे सेक्रेटरी श्री. मुजाहिद मेयर संस्थेचे विद्यमान सल्लागार श्री.लियाकत खतीब विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.इरफान शेख* तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदीनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Author: Yogesh Pedhambkar
योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी