छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कसबा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
संघटनेचे आवाहन – संभाजीप्रेमींनी सहभागी व्हावे
तळवली (मंगेश जाधव)
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६८ वी जयंती आज, बुधवार १४ मे २०२५ रोजी कसबा येथे साजरी होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले असून, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती, कसबा संगमेश्वर यांच्या वतीने सर्व संभाजीप्रेमींना कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
- सकाळी ७.३० ते ९.००: अभिषेक पूजा
- सकाळी ९.०० ते १.००: जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा
- सायंकाळी ४.०० ते ५.००: वारकरी दिंडी
- सायं. ५.०० ते ५.३०: बक्षीस वितरण व मा. डॉ. उदय सामंत यांचे मनोगत
- सायं. ५.३० ते ६.३०: हरिपाठ
- सायं. ७.००: सुसंगीत भजन – श्री काळीश्री जुगाई महिला भजन मंडळ, देवरुख (बुवा: ऋतुजा राकेश टाकळे)
या कार्यक्रमातून संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि इतिहासाचे स्मरण होणार असून, युवकांना प्रेरणा देणारे उपक्रम होणार आहेत.
#संभाजीराजे #छत्रपतीसंभाजीराजे #कसबा #संगमेश्वर #संभाजीमहाराजजयंती #रत्नागिरी
फोटो