गुहागर न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल 13 हजार प्रकरणांचा निकाल
71 लाखांहून अधिक रकमेची सेटलमेंट; पती-पत्नीमध्ये सलोख्याने नव्याने संसाराची सुरुवात
बातमी – संदेश कदम
गुहागर | प्रतिनिधी
गुहागर येथील दिवाणी न्यायालयात पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण 13 हजार 233 प्रकरणांचा निकाल लावण्यात आला. यामध्ये 5 प्रलंबित केसेस तर 13 हजार 228 प्री-लिटिगेशन मॅटर्सचा समावेश होता. एकूण निकालांपैकी तब्बल रुपये 71 लाख 43 हजार 485 इतक्या रकमेची सेटलमेंट करण्यात आली.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश पी. व्ही. कपाडिया यांनी या लोकअदालतीत पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांना पॅनल विधिज्ञ अक्षता संजय कदम यांची साथ लाभली.
यामध्ये दोन पोटगी प्रकरणे निकाली काढण्यात आली. विशेष म्हणजे, एका प्रकरणात पती-पत्नीमधील वाद सलोख्याने मिटवला गेला आणि त्यांनी पुन्हा नव्या विश्वासाने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला.
हॅशटॅग्स:
#गुहागर #राष्ट्रीयलोकअदालत #न्यायालय #सेटलमेंट #पोटगी #गुहागरन्यायालय #RatnagiriNews #LegalAid #LokAdalat
फोटो

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators