कोकणात पर्यटनवाढीसाठी हाऊसबोटचा नवा अध्याय! जांभारीत उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण
रत्नागिरीत महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणारा अनोखा प्रकल्प; हाऊसबोटच्या माध्यमातून महिलांना व्यवसायाची मोठी संधी

रत्नागिरी -जिल्हा परिषद रत्नागिरी-सिंधुदुर्ग समृद्ध योजना २०२३-२४ अंतर्गत आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाकांक्षी ‘हाऊसबोट’ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. जांभारी येथे झालेल्या लोकार्पण सोहळ्याला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत प्रमुख उपस्थित होते.
कोकणात पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी केरळनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रकल्प सुरु करण्यात आला असून, राईबंदर नंतर जांभारी येथे दुसरी हाऊसबोट कार्यान्वित झाली आहे. पुढील टप्प्यात जिल्ह्यात आणखी १० हाऊसबोट देण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी यावेळी जाहीर केले. या हाऊसबोट्समध्ये उच्च प्रतीच्या वास्तव्याची सुविधा, कोकणी खाद्यपदार्थ व पाहुणचार यामुळे पर्यटकांना अनोखा अनुभव मिळणार आहे.
“महिलांसाठी विविध व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, ग्रामीण महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही,” असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले. त्यांनी पुढे सांगितले की, “बचत गटाच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, ज्यामुळे संपूर्ण ग्रामीण विकासाचा मार्ग मोकळा होईल.”
या कार्यक्रमाला जि.प. माजी सभापती व शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, बाबुशेठ पाटील, सरपंच आदेश पावरी तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी, महिला बचत गटाच्या सदस्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॅशटॅग्स:
#हाऊसबोटरत्नागिरी #उदयसामंत #महिलासक्षमीकरण #कोकणपर्यटन #जांभारीप्रकल्प #रत्नागिरीघटना #UMEDYojana #महायुतीसरकार
फोटो