कामोठे कॉलनी फोरमतर्फे मॉन्सूनपूर्व कामांचा आढावा
प्रभाग अधीक्षक भंडारे यांच्यासोबत बैठक; समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी
नवी मुंबई (मंगेश जाधव):
कामोठे कॉलनी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभाग कार्यालय, कामोठे येथे शहरातील विविध नागरी समस्या मांडण्यासाठी नियोजित बैठक घेतली. ही बैठक सहाय्यक आयुक्त श्री. ठाणेकर यांच्यासोबत होण्याचे निश्चित होते, मात्र त्यांच्या कोकण आयुक्त कार्यालयातील उपस्थितीमुळे प्रभाग अधीक्षक श्री. भंडारे यांच्यासमवेत ही बैठक झाली.
या बैठकीत पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, मातीचे ढिगारे उचलणे, मोकळ्या भूखंडांची स्वच्छता, रस्ते दुभाजकावरील झाडांची निगा, फुटपाथवरील अतिक्रमण, धोकादायक वृक्षांची छाटणी यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
पालिकेच्या वतीने संबंधित विभागांना त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस उपस्थित प्रतिनिधी:
कामोठे कॉलनी फोरम अध्यक्ष मंगेश आढाव, महिला अध्यक्ष जयश्री झा, सचिव बापू साळुंखे, शहर संघटक अनिल पवार, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष जयवंत खरात, समन्वयक महेंद्र पवार.
#कामोठे #MonsoonPrep #NaviMumbaiNews #PMC #CivicIssues #RainReady #कामोठे_फोरम
फोटो