पहलगाम हल्ल्याचा परीणाम विमानतळावर! ‘सेलेबी नास’ कंपनीवर बंदी, ३७०० कामगारांना भारतीय कामगार सेनेचा आधार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पहलगाम हल्ल्याचा परीणाम विमानतळावर! ‘सेलेबी नास’ कंपनीवर बंदी, ३७०० कामगारांना भारतीय कामगार सेनेचा आधार

उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर कामगारांना दिलासा भेट; इंडो थाई कंपनीत नव्याने रोजगाराची संधी.

बातमी…..
मुम्बई – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशांविरोधात कडक कारवाई करत, तुर्कीच्या काही कंपन्यांवर बंदी घातली आहे. याचा मोठा परिणाम मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसून आला आहे.

विमानतळावर ग्राउंड हॅन्डलिंगचे काम करणाऱ्या तुर्कीच्या ‘सेलेबी नास’ या कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्यात आला. यामुळे कंपनीतील तब्बल ३७०० कामगार बेरोजगार होण्याच्या उंबरठ्यावर आले. मात्र, भारतीय कामगार सेनेने पुढाकार घेत या कामगारांसाठी पर्यायी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आता हे कामगार ‘इंडो थाई’ कंपनीत पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी व कामगारांनी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. उद्धवसाहेबांनी या संकटात सापडलेल्या कामगारांना आधार देत, “शिवसेना ही कामगारांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभी राहील,” असा विश्वास दिला.

या भेटीप्रसंगी शिवसेना नेते व खासदार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, संयुक्त सरचिटणीस संजय कदम तसेच सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हॅशटॅग्स:
#सेलेबी_नास #मुंबईविमानतळ #भारतीयकामगारसेना #उद्धवठाकरे #शिवसेना #कामगारआधार #पहलगामहल्ला #तुर्कीकंपनी #इंडोथाई

फोटो

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...