कालकथीत वडिल शिवराम पांडूरंग जाधव, आई प्रभावती शिवराम जाधव यांच्या स्मरणार्थ आनंद शिवराम जाधव यांच्या वतीने आबलोली ग्रामपंचायतीला भारतीय राज्य घटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट
आबलोली (संदेश कदम)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय,धम्म आणि शैक्षणिक चळवळीत निस्वार्थीपणे,कर्तव्यदक्ष, एकनिष्ठ कार्य तत्पर कठीण समयी खंबीरपणे ऊभे राहणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील विश्वासू कार्यकर्ते गुहागर तालुक्यातील कुडली गावाच्या सर्वांगिण विकासासाठी झटणारे कुडली गावचे सुपूत्र कालकथीत आदरणीय शिवराम पांडूरंग जाधव आणि त्यांना खंबीरपणे सावली सारखी साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी कालकथीत आदरणीय प्रभावती शिवराम जाधव या आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचे धाकटे चिरंजीव आदरणीय आनंद शिवराम जाधव यांच्या संकल्पनेतून आई वडिलांचा सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक व.आर्थिक वसा पुढे चालवीत असून गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीला आनंद शिवराम जाधव यांच्याकडून मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटना प्रत व घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके,ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी यांना देण्यात आली आहे
यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद शिवराम जाधव यांनी केले त्यानंतर बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक बबनराव कदम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते कालकथीत आदरणीय शिवराम पांडूरंग जाधव, कालकथीत आदरणीय आई प्रभावती शिवराम जाधव यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि विकासात्मक कार्याचा गौरव करुन ग्रामपंचायतीमध्ये भारतीय संविधान हे दर्शनी भागी काचपेटीत ठेवा जे – ने करुन ग्रामपंचायतीमध्ये आल्या नंतर ते सर्वांना दिसले पाहिजे असे भारतीय संविधान ठेवा आणि या संविधानाच्या प्रमाणे ग्रामपंचायतीचा कारभार करा अशी विनंती करुन आनंद शिवराम जाधव यांचे बबनराव कदम यांनी आभार मानले त्यानंतर पंचशिल बौद्ध विकास मंडळ कुडली या मंडळाचे सल्लागार व महाराष्ट्र बॅंकेचे सेवानिवृत्त कर्मचारी अनंत कांबळे, आबलोलीचे ग्रामविकास अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांनी कालकथीत आदरणीय शिवराम पांडूरंग जाधव, कालकथीत आई प्रभावती शिवराम जाधव यांचा तसेच आदरणीय आनंद शिवराम जाधव आणि जाधव कुटुंबीयांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक विकासात्मक कार्याचा गौरव केला.
यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सभागृहात विचार पीठावर तंटामुक्त समिती आबलोलीचे अध्यक्ष आप्पा कदम, सरपंच सौ. वैष्णवी नेटके,ग्रामविकास अधिकारी बाबूराव सुर्यवंशी,उपसरपंच अक्षय पागडे,बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक बबनराव कदम, आनंद शिवराम जाधव, पंचशिल बौद्ध विकास मंडळ कुडली या मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव, तंटामुक्त समिती कुडलीचे अध्यक्ष अनिल जाधव, अनंत कांबळे, रविंद्र जाधव, तुकाराम शिवराम जाधव, कु. साक्षी आनंद जाधव,ग्रामपंचायत सदस्य संजय कदम आदी. मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला आनंदवन बुद्ध विहार मौजे आबलोली या विश्वस्त संस्थेचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, गाव मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम कदम, सेक्रेटरी अविनाश कदम, कार्यकारणी सदस्य व उद्योजक अमोल कदम,प्रमोद पवार, कार्यकर्ते सिध्दार्थ पवार,संजय कदम, उदय कदम,मिलिंद कदम,आनंद कदम,विनोद कदम,सुरेश भाऊ पवारआदी. उपस्थित होते