नितीन बगाटे रत्नागिरीचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नितीन बगाटे रत्नागिरीचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक

छत्रपती संभाजीनगरचे डॅशिंग पोलीस उपायुक्त रत्नागिरीत; परभणी, चंद्रपूर, सिंधुदुर्गमधील ठसठशीत कामगिरी

 

बातमी… मंगेश जाधव 

रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नितीन दत्तात्रय बगाटे यांची नियुक्ती झाली आहे. माजी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली झाल्यानंतर ही जबाबदारी बगाटे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

 

छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले बगाटे हे डॅशिंग आणि कणखर आयपीएस अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. याआधी त्यांनी सिंधुदुर्गमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक, परभणीमध्ये प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक आणि चंद्रपूरमध्येही जबाबदारी सांभाळली आहे.

 

हिंगोली जिल्ह्यातील निशाणा गावचे रहिवासी असलेले बगाटे हे आयआयटी शिक्षणानंतर काही काळ खासगी कंपनीत कार्यरत होते. शिक्षक म्हणून सुरुवात केल्यानंतर त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस सेवेत प्रवेश केला. २०१८ ते २०२० दरम्यान परभणी येथे त्यांनी निवडणुकीच्या काळात अनेक ठोस निर्णय घेऊन चर्चेत आले.

 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि खासदार संजय जाधव यांच्याशी झालेली वादविवादाची प्रकरणेही गाजली होती. शरद पवार यांच्या सभेत डी-झोनमध्ये शिरलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याच्या कारवाईतून त्यांची निर्भीड कार्यपद्धती समोर आली. वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करताना त्यांनी स्थानिक राजकारण्यांना न जुमानता कायदा अंमलात आणला.

 

नव्या जबाबदारीसाठी रत्नागिरीत दाखल होताना बगाटे यांच्याकडून जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्था व्यवस्थापनात नवे बदल आणि काटेकोर अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

हॅशटॅग्स:

#RatnagiriPolice #NitinBagateIPS #DistrictSP #MaharashtraPolice #IPSOfficer #PoliceTransfer #रत्नागिरी #पोलीसअधीक्षक

 

फोटो

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...