आईच्या कुशीतच चिमुकल्याचा होरपळून मृत्यू सोलापुरातील हृदय द्रावक घटना.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आईच्या कुशीतच चिमुकल्याचा होरपळून मृत्यू सोलापुरातील हृदय द्रावक घटना.

 

आगीनं घेतला मन्सूर कुटुंबाचा वेध; शेवटच्या क्षणीही आईने मुलाला घट्ट मिठीत धरलं

 

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरात उस्मान मन्सूर यांच्या टॉवेल कारखान्यात भीषण आग लागून आठ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यात उस्मान मन्सूर यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश असून, विशेषतः एक वर्षाच्या युसुफ या चिमुकल्याचाही यात दुर्दैवी अंत झाला.

 

ही घटना गुरुवारी रात्री तीनच्या सुमारास घडली. मन्सूर कुटुंब दुसऱ्या मजल्यावर झोपलेले असताना अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करताच कुटुंबीयांनी जीव वाचवण्यासाठी बाथरूममध्ये आसरा घेतला. त्या भयावह क्षणी एक वर्षाचा युसुफ हा आपल्या आईच्या कुशीत विसावलेला होता. शेवटच्या क्षणापर्यंत आईने आपल्या लेकराला घट्ट मिठीत धरलं होतं.

 

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मृतदेहांचा शोध सुरू असताना एक हृदयद्रावक चित्र समोर आलं – चिमुकला युसुफ आपल्या आईच्या कुशीत मृतावस्थेत सापडला. हे दृश्य पाहून अग्निशमन दलाचे जवानही क्षणभर भावुक झाले.

 

या आगीत मन्सूर कुटुंबातील एकाच घरातील चार सदस्यांचा मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे.

 

हॅशटॅग्स:

#SolapurFire #AkkalkotAccident #HeartbreakingNews #TragicFire #FireAccident #युसुफ #सोलापूर #अक्कलकोट #RatnagiriVartahar

 

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...