अनिल कदम यांना गगनभरारी समर्थ सन्मान पुरस्कार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

निल कदम यांना गगनभरारी समर्थ सन्मान पुरस्कार

पुणे – शैक्षणिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उपक्रमशील व शिक्षणतज्ज्ञ अनिलकुमार कदम यांना “गगनभरारी समर्थ सन्मान २०२५” या पुरस्काराने पुण्यात सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात उद्योजक दीपक मोकाशी यांच्या हस्ते त्यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

कदम यांनी उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, वरिष्ठ मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख अशा विविध पदांवर काम करत असताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी केलेले योगदान लक्षणीय आहे. त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय, संशोधनात्मक, प्रशिक्षण आणि लेखन क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला.

पुरस्कार स्वीकृतीवेळी मराठी मासिक ‘दमयंती’च्या संपादिका सौ. कल्पना कदम आणि बाल साहित्यिक जिज्ञासा कदम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे बुक फेअरचे संस्थापक अध्यक्ष राजेश पांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विद्याधर ताठे आणि सेवानिवृत्त प्राचार्य अनिल कुलकर्णी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनपर विचार मांडले.

या प्रसंगी अनिलकुमार कदम यांच्या शैक्षणिक कार्यावर आधारित ‘गगनभरारी’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकटेश कल्याणकर यांनी केले. सूत्रसंचालन सुनील धनगर आणि प्रज्ञा कल्याणकर, तर आभारप्रदर्शन मानसी चिटणीस यांनी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन समर्थ फाउंडेशनचे किरण इनामदार, वल्लरी मिडियाचे व्यंकटेश कल्याणकर, ज्योती इनामदार, श्रद्धा जगदाळे, गणेश चप्पलवार, आणि जगन्नाथ कुलकर्णी यांनी केले.


 

Ratnagiri Office
Author: Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...