“शिवराज्याभिषेक ६ जूनला नाही, तर तिथीनुसारच साजरा करा!” – संभाजी भिडेंची ठाम मागणी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख भिडेंचा इतिहास आणि परंपरेचा दाखला देत ठाम सूर; ६ जूनऐवजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राज्याभिषेकाचा सोहळा व्हावा, अशी भूमिका
सांगली -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याबाबत मोठं विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. “शिवराज्याभिषेकाचा सोहळा ६ जून रोजी न साजरा करता तिथीनुसार म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला साजरा करण्यात यावा,” अशी ठाम भूमिका भिडे यांनी मांडली आहे.
६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे दरवर्षी ६ जून या दिवशी विविध ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळे आयोजित केले जातात. मात्र, या दिनांकावर आक्षेप घेत भिडेंनी स्पष्ट केलं की, “तारीख नव्हे, तर तिथी हा खरा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आधार आहे.” त्यामुळे तिथीप्रमाणेच हा सोहळा साजरा करणे योग्य ठरेल, असं ते म्हणाले.
भिडे यांनी ही मागणी करत असताना इतिहासातील नेमकी तारीख व परंपरेचा हवाला दिला आहे. “तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला झाला होता, त्यामुळे ६ जूनला सोहळा साजरा करणं चुकीचं असून, ही परंपरा बदलावी,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.
मात्र संभाजी भिडे यांच्या या मागणीला राष्ट्रवादी चे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. तर मराठा संघ ठण यांनी हि याचा निषेध केला आहे.
हॅशटॅग्स:
#शिवराज्याभिषेक #छत्रपतीशिवाजीमहाराज #संभाजींभिडे #शिवप्रतिष्ठान #इतिहास #महाराष्ट्र #JyeshthaShuddhaTrayodashi
फोटो