छायाचित्रकार गुरु चौगुले यांना कला गौरव पुरस्कार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

छायाचित्रकार गुरु चौगुले यांना कला गौरव पुरस्कार

रत्नागिरीत शिवस्वराज्य फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा

रत्नागिरी | प्रतिनिधी

शिवस्वराज्य फाउंडेशनच्यावतीने कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा शनिवार, २४ मे २०२५ रोजी रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राज्यस्तरीय जीवनगौरव व कला गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

या सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ छायाचित्रकार आणि ‘चौगुले फोटो’चे संस्थापक गुरु चौगुले यांना ‘कला गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कोकणातल्या फोटोग्राफी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला.

गुरु चौगुले हे सध्या रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो मोफत वेबिनार व कार्यशाळांचे आयोजन करून अनेक फोटोग्राफर्सना मार्गदर्शन केले आहे. संघटना बांधणीत त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. त्यांनी चित्रित केलेल्या अनेक शॉर्ट फिल्म्सना पुरस्कार प्राप्त झाले असून, ‘आदर्श छायाचित्रकार’ यांसह फोटोग्राफी क्षेत्रातील अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत.

गुरु चौगुले विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय असून, कोकणातील युवक-युवतींना नाट्य, सिनेमा आणि मॉडेलिंगच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. स्थानिक बाजारपेठेला चालना देण्याच्या दृष्टीनेही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी बहुमूल्य योगदान दिले आहे.

त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत शिवस्वराज्य फाउंडेशनतर्फे त्यांना यंदाचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार देण्यात आला. कला, नाट्य आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...