कर्करोग निदानासाठी फिरते रुग्णालय व्हॅन सुरु – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कर्करोग निदानासाठी फिरते रुग्णालय व्हॅन सुरु – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

 

ग्रामीण भागात मोफत कर्करोग तपासणीसाठी अभिनव उपक्रम; रत्नागिरी जिल्ह्यात मे-जूनमध्ये गावोगावी मोहिम राबवणार

 

रत्नागिरी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे आज अत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅनचा (फिरते रुग्णालय) शुभारंभ पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. या उपक्रमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मुख, स्तन व गर्भाशय मुख कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.

या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, प्रांताधिकारी जीवन देसाई, राहुल पंडित, बंड्या साळवी, बिपीन बंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या व्हॅनद्वारे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत कर्करोग निदानाची सेवा पोहोचवण्याचा हेतू असून, यामध्ये स्तनाच्या तपासणीसाठी डिजिटल मशीन व गर्भाशयाच्या मुखाच्या तपासणीसाठी कॉल्पोस्कोप यांसारखी उपकरणे उपलब्ध आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी या व्हॅनची माहिती पालकमंत्र्यांना दिली.

आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना या मोफत तपासणी मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाचा आढावा

शुभारंभानंतर पालकमंत्री डॉ. सामंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. भास्कर जगताप, डॉ. अनिरुद्ध आठल्ये, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

#कर्करोगतपासणी #डॉउदयसामंत #रत्नागिरीआरोग्य #फिरतेरुग्णालय #CancerAwareness #RuralHealthCare #RatnagiriNews #GovernmentHospitalInitiative

 

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...