अडुर कोंडकरूळ पंचक्रोशीत विजेचा लपंडाव नागरिकांचे हाल,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर – समस्या लवकर सोडवा दिप हळ्ये यांची स्थानिक प्रशासनाकडे आग्रही मागणी
गुहागर ( संदेश कदम वार्ताहर )
गुहागर तालुक्यातील अडुर कोंडकरूळ नागझरी बुदल या पंचक्रोशीत मुसळधार पावसामुळे जन जीवन विस्कळीत झाले आहे विजेचा पुरवठा सातत्याने खंडित होतं असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत . पिण्याच्या पाण्याचा डीपी जळला आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.स्थानिक प्रशासन यांनी या बाबत ठोस पावले उचलावीत व समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी आग्रही मागणी गुहागर तालुका बळीराज सेनेचे तालुका कार्यकारणी सदस्य व समाजसेवक दीप हळये यांनी केली आहे
दिप हळ्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार अडुर येथे तब्बल पहिले चार दिवस व नंतर पाच दिवस असे एकूण नऊ दिवस पिण्याचे पाणी न आल्याने सर्व सामान्य जनतेचे बेहाल झाले आहेत डीपी जळल्याने पाणी येत नाही असे सांगण्यात येते विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होतं असल्याने मोबाईल बंद आहेत रेंज नाही पंप बंद आहेत अश्या अनेक समस्या आहेत याचा फटका सामान्य जनतेला पडत आहे असे दिप हळये यांचे म्हणणे आहे