???? गाबीत समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापनाची हालचाल!
???? मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक, आमदार निलेश राणे यांचाही सहभाग
मुंबई | गाबीत समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री. अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आमदार निलेश राणे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल तसेच गाबीत समाज संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणावर गाबीत समाजाचे वास्तव्य असून, हा समाज पारंपरिकरित्या मासेमारी आणि संबंधित व्यवसायांवर अवलंबून आहे. मात्र, आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत त्यांच्या पारंपरिक व्यवसायांना विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे गरजेचे असून, त्याद्वारे आधुनिक व्यवसायांमध्ये गाबीत समाजाला सामावून घेता येईल, आवश्यक प्रशिक्षण, कर्ज व अनुदानासारखी आर्थिक मदत पुरवता येईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
मंत्री अतुल सावे यांनी या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेत असल्याचेही या बैठकीत स्पष्ट झाले.
—
#गाबीत_समाज #आर्थिक_विकास_महामंडळ #कोकण #मंत्रालय #मुंबई #मासेमारी_व्यवसाय #AtulSave #NileshRane #CMOMaharashtra
???? फोटो