गुहागर पोलीस ठाण्यात सामाजिक सलोखा समिती स्थापन, पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी बैठकीत केल्या सदस्यांना विविध सूचना
आबलोली (संदेश कदम)
गुहागर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सामाजिक सलोखा समिती सदस्यांची पोलीस ठाणे येथे बैठक घेऊन “सामाजिक सलोखा समिती” ही संकल्पना माननीय पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांची असून सदर समिती स्थापना करण्यामागचा उद्देश गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी सर्व सदस्यांना समजावून सांगून उपस्थितांना सामाजिक सलोखा राखण्यासंदर्भात विविध सूचना करण्यात आल्या. यावेळी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात सामाजिक शांतता राहावी याकरिता सर्वधर्मीय प्रतिष्ठित व्यक्ती तसेच प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर यांचा या कमिटीमध्ये समावेश करण्यात आला. या कमिटीच्या माध्यमातून पोलीस ठाणे स्तरावर महत्त्वाच्या सणाचे पार्श्वभूमीवर मीटिंग घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकरिता प्रयत्न करण्यात येणार असून कमिटी सदस्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. सामाजिक सलोखा समिती सर्वसमावेशक असून या समितीच्या वतीने सर्व धर्मीय सण आनंदात साजरे होण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार असलेबाबत नमूद केले.
आगामी बकरी ईद सणाचे अनुषंगाने गौवंश हत्या तसेच गोमांस वाहतूक इत्यादी वरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकरिता स्थानिक पातळीवर बैठक घेऊन प्रयत्न करणे बाबत सांगण्यात आले. सायबर क्राइम बाबत सतर्क राहणे ऑनलाईन नवनवीन येणारे किंवा आर कोड बाबत सूचना दिल्या. शहर व गावात अमली पदार्थ विरोधी मोहीम अंतर्गत नशा पाण करणारे बाळगणारे व विक्री करणाऱ्या अशा घटकांवर लक्ष ठेवणे. सर्व धार्मिक सण उत्सवाचे कोणत्याही समस्या असल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती देण्याचे सांगण्यात आले.
सदर बैठकी करता सामाजिक सलोखा समितीचे २४ सदस्य उपस्थित होते. यामध्ये वकील सुशील अवेरे, गुहागर नगरपंचायत माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे,शिवसेना गुहागर तालुका प्रमुख दीपक कनगुटकर, सामाजिक कार्यकर्ते साबिर साल्हे, दीपक परचुरे, सामाजिक कार्यकर्ते भगवान कदम,पाटपन्हाळे ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश चव्हाण, पत्रकार गणेश किर्वे, बळीराज सेना जिल्हाध्यक्ष पराग कांबळे, सुधाकर कांबळे, श्याम आठवले, संतोष वरंडे, पत्रकार सत्यवान घाडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.