कोकणाच्या विकासावर अमित शहा यांच्यासोबत सखोल चर्चा : अनिकेत पटवर्धन यांना मिळाली विशेष भेट
मुंबई विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जल्लोषात स्वागत; कोकणातील राजकीय व सामाजिक विषयांवर अनिकेत पटवर्धन यांच्याशी सौहार्दपूर्ण संवाद
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभाला राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या स्वागत प्रसंगी कोकणातील उदयोन्मुख नेतृत्व अनिकेत पटवर्धन यांना अमित शहा यांची सदिच्छा भेट घेण्याची विशेष संधी लाभली. ही संधी त्यांना भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे मिळाली, असे सांगण्यात येते.
भेटीदरम्यान अमित शहा यांनी कोकणातील राजकीय वातावरण, सामाजिक घडामोडी आणि स्थानिक जनतेच्या अडचणी याबाबत विशेष आस्थेने माहिती जाणून घेतली. कोकणातील विकास प्रक्रिया, स्थानिक प्रश्नांची दिशा आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाविषयी दोघांमध्ये सौहार्दपूर्ण चर्चा झाली.
अनिकेत पटवर्धन यांनीही कोकणातील जनतेच्या भावना, विकासाची गरज आणि युवकांच्या संधी याविषयी केंद्र सरकारकडून अपेक्षा व्यक्त केल्या. अमित शहा यांनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले व भविष्यात कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
ही भेट केवळ एक सन्मान नव्हे, तर कोकणातील प्रश्न थेट केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची प्रभावी संधी असल्याचे अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले.
हॅशटॅग्स:
#AmitShah #AniketPatwardhan #MumbaiVisit #KonkanVikas #RavindraChavan #BJPMaharashtra #PoliticalNews #RatnagiriVartahar
फोटो