गुहागर येथील गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेजच्या १९८९ – ९० च्या माजी विद्यार्थांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
३५ वर्षांनी कॉलेज मधल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि पुन्हा भेटीसाठी कटीबद्ध
आबलोली (संदेश कदम)
गुहागर येथील श्री.देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज गुहागर या कॉलेजच्या सन १९८९ – ९० या अकरावी कॉमर्स मध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थांचा स्नेह मेळावा १ जून २०२५ रोजी गुहागर तालुक्यातील मोडका आगर येथील हॉटेल शांताई येथे उत्साहात संपन्न झाला. ३५ वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र आले कॉलेज मधल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन पुन्हा भेटीसाठी कटीबद्ध झाले
सन १९८९ – ९० साली श्री. देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज ११ वी कॉमर्स या कॉलेज मध्ये केलेली मस्ती, एकत्र केलेला अभ्यास, एकत्र केलेला प्रवास, त्यामधील गमती जमती आणि शिक्षकांनी केलेल्या शिक्षा, मित्रांमुळे खाल्लेला मार अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थांनी गप्पा गोष्टी करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी सर्वांनी आपण सद्या कार्यरत असलेले कार्यक्षेत्र, जीवनामध्ये प्राप्त केलेले यश, आपली आणि आपल्या कुटुंबांची माहिती देऊन आपला परिचय करून दिला तर यशस्वी उद्योजक यांनी मौल्यवान माहिती दिली त्यानंतर हौशी विद्यार्थ्यांनी गाणी आणि नृत्य सादर करुन धमाल केली तर अनुपस्थित विद्यार्थांनी व्हिडिओ कॉल करुन सर्वांशी संवाद साधला
गुहागर कॉलेज मधून शिक्षण घेऊन हे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. मुंबई,कोल्हापूर,पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून मुसळधार पाऊस असून सुद्धा दिनांक १ जून २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता हॉटेल शांताई येथे सर्व माजी विद्यार्थी हॉटेल शांताई येथे एकत्र आले सकाळच्या अल्पोप अहारानंतर श्री. अजित अहिरराव, सौ. ज्योती सहस्त्रबुद्धे – परचुरे मॅडम यांनी गुलाबाचे फूल देऊन उपस्थितांचे स्वागत केले आठवले सरांचा ५० वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानंतर फार कमी वयात सकाळ मिडियाचा उद्योजक गौरव हा पुरस्कार प्राप्त झालेले आबलोली गावचे उद्योजक सचिनशेठ बाईत, नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आलेले वैभव गुहागरकर, नगरसेविका म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सौ. ज्योती सहस्त्रबुद्धे – परचुरे आणि सलग १५ वर्ष सरपंच पद यशस्वीपणे भूषवीलेले संतोष आंब्रे तसेच हे स्नेहसंमेलन यशस्वीपणे आयोजित केलेले राजेश विंचू या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जेवणानंतर पुन्हा एक ओपन फोरम चर्चा करून आपल्या वर्गातील सद्या हयात नसलेल्या मित्र – मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी अजित अहिरराव,सचिन बाईत,चंद्रकांत साळवी,विनायक झगडे, राजेश कोळवणकर,राजेश विंचू,पिरोज आरेकर,संतोष बारगोडे,वैभव गुहागरकर, सुनिल दणदणे,मिलिंद गुरव,पुंडलिक घाडे,संतोष शिंदे,उत्तम कोलगे, राजेश भोसले,संतोष आंब्रे,अनिल घाणेकर,दिपक वेस्वीकर,वर्षा कनगुटकर,आशा तुळसणकर,हेमचंद्र मोरे, ज्योती सहस्त्रबुद्धे,अनिता आरेकर – बोरकर,विष्णू सांगळे आदी.उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कोळवणकर यांनी केले