जागतीक पर्यावरण दिनानिमीत्त वृक्षारोपण*
“वृक्ष संवर्धनाने पर्यावरणाचा समतोल राहिल” – सुनिल सकट
अ.नगर /प्रतिनीधी: ५ जुन जागतीक पर्यावरणदिना निमीत्त अहिल्यानगर येथील लालटाकी भागात वृक्षारोपण उपक्रम घेण्यात आला.
वातावरणात ऑक्सिजन ची नियमित निर्मीती व्हावी व सजीव सृष्टीस मुबलक प्रमाणात प्राणवायु मिळावा. ह्या उद्देशाने समाजसेवक सुनिल सकट विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे उपक्रम राबवत असतात.जागतीक पर्यावरण दिनाचे औचीत्य साधुन वृक्षारोपण करण्यात आले. संतोष शिरसाट व सुनिल सकट यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्या प्रसंगी विनोद शिरसाठ,अनिल वाघमारे,अंजना शिरसाट, मल्हार कुचेकर,सचिन शिरसाट,दिपक आव्हाड,गौरी शिरसाट,अनिल शेलार,कुणाल शिरसाट,विनायक शिरसाट आदी नागरीक उपस्थित होते. वृक्षारोपणाचा उपक्रम सुनिल सकट यांच्या पुढाकारातुन राबवण्यात आला.सदर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी संतोष शिरसाट यांनी स्विकारली.
नदकुमार बगाडे: अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी