जेष्ठ समाजसेवक कै. अनंत हरी बंडबे यांचे वृद्धपाकाळाने दुःखद निधन
राजापूर – संदीप शेमणकर
राजापूर तालुक्यातील वाडा पाणेरे गावचे सुपुत्र, समाजसेवक,राजकीय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेले. गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास मनी ठेवणारे,वाडा पाणेरे ग्राम विकास मंडळाचे मा.अध्यक्ष,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुरस्करते, वाडा पाणेरे गावात श्री. सत्यनारायण पूजेनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राजापूर तालुक्यात प्रथमच कार्यक्रम आयोजित करून लोकांच्या मनातील भीती दूर करणारे, राजापूर विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय आमदार, मा. कामगार मंत्री कै. लक्ष्मण र. हातणकर यांचे सहकारी राहिलेले आणि राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी चे मा.व्हॉइस चेरमन, तसेच विकासाचा महामेरू,विविध सामाजिक संस्था मुंबई ते जन्मभूमी विविध पदावर कामकाज करणारे,आपल्या कार्यकाळात विविध विकास कामे मार्गी लावली.
नेमीच सर्वांशी आदराने बोलणारे
कै. अनंत हरी बंडबे यांचे गुरुवार दिनांक 5 जून 2025 रोजी. सकाळी वृद्धपाकाळाने दुःखद निधन झाले.ते 71 वर्षाचे होते.दशक्रिया विधी 14 जून 2025 रोजी. व बारावे, तेरावे कार्य 16 जून 2025 रोजी.त्यांच्या राहत्या घरी मूळ गाव जन्मस्थान वाडा पाणेरे येथे करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पाश्चात त्यांचे दोन भाऊ, दोन मुलगे,दोन सुना,नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.
सामाजिक क्षेत्रातील उमदे नेतृव हरपल्याने बंडबे कुटूंब, वाडा पाणेरे, मोगरे – राजवाडी पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.सर्व ठिकाणी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.