???? जयंत पाटील यांचा धक्कादायक निर्णय!
“मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा” – वर्धापनदिनीच शरद पवारांना विनंती; राजकीय वर्तुळात खळबळ
????पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनीच पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान करत “मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा” अशी थेट मागणी शरद पवारांकडे केली आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे.
एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच, वेगवेगळे वर्धापन दिन कार्यक्रम पार पडले. अशातच जयंत पाटील यांच्या मागणीने पक्षात अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे.
???? “ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे”
जयंत पाटील म्हणाले, “ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे. आम्ही तुकारामांच्या बाजूचे आहोत. भाजपकडे पूर्वी फक्त दोन खासदार होते, आज ते मोठा पक्ष आहेत. त्यामुळे आपल्यालाही एकत्र राहून काम करण्याची गरज आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “मी काही पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमासाठी बोलावले नाही, कारण कार्यकर्ते नाराज झाले होते. प्रशांतने वेळ घेतली म्हणून पुण्यात कार्यक्रम झाला. काही त्रुटी झाल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे.”
???? सरकारवरही साधला निशाणा
“शिवभोजन थाळी बंद झाली, अनाथांचे पैसे वळवले जात आहेत. सर्किट हाऊसवर २ कोटी रुपये एका पीएकडे सापडले. तीन वर्षांपासून महापालिका प्रशासकांकडे आहेत. जळगाव महापालिका निवडणूक होईल की नाही, यावर शंका आहे,” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवरही जोरदार हल्ला चढवला.
“पवार साहेबांवर विनाकारण टीका केली जाते. त्यांनी ओबीसींचं संरक्षण केलं. आजही त्यांची तीच भूमिका आहे. अजूनही अनेकांना पवार साहेबांचा दरारा वाटतो,” असे म्हणत जयंत पाटील यांनी आव्हाडांवरही अप्रत्यक्ष टोला लगावला.
???? #जयंतपाटील #राष्ट्रवादीकाँग्रेस #शरदपवार #राजकारण #NCP #PoliticalNews #BreakingNews
???? फोटो