शासकीय कार्यालयामध्ये वाढदिवस व अन्य वैयक्तिक कार्यक्रम साजरे केल्यास होणार कारवाई
🔹 – माहिती अधिकार *जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर* यांनी केली तक्रार
चिपळूण (वार्ताहर):-
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी यांचे वाढदिवस, विवाह वर्धापन दिन व अन्य वैयक्तिक कार्यक्रम साजरे होताना दिसून येतात. व अनेक वेळा *महसूल विभाग मध्ये अनेक वेळा सामान्य नागरिकांना बसवून ठेवून वाढदिवस साजरा करताना निदर्शनास येत आहे. व प्रसंगी त्याचे फोटो सुद्धा आहेत.* परंतु याबाबत अधिकारी यांना विचारणा केल्यावर तुम्हाला काय अडचण आहे हो… असे शब्द वापरले जातात. आपल्या अधिनस्त कार्यालयात तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आस्थापना यांना आपण या कार्यक्रमाबद्दल बंदी आणून निदर्शनास आल्यास कार्यालय प्रमुखांना तसे लेखी पत्राद्वारे शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. अशी मागणी माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महा.राज्य रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत कार्यक्रमांमध्ये केक कापणे, सजावट करणे, मिठाई वाटणे, फुगे लावणे, फोटोशूट करणे इत्यादी प्रकार सर्रास घडतात.या कृती शासकीय कामकाजात व्यत्यय आणतात. आणि कार्यालयीन शिस्त भंग करतात. यावर योग्य ती कार्यवाही व्हावी म्हणून, खालील कायदेशीर तरतुदींचा आधार घेवून आपण जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना आदेश द्यावेत.
कायदेशीर संदर्भ:
1. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९
नियम ३(१):
प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचारी याने कार्यालयीन कामकाजात उच्चतम प्रामाणिकपणा, निष्ठा व शिस्त राखावी.
नियम ३(२):
कर्मचारी कार्यालयाच्या सन्मानाला कोणत्याही प्रकारे धक्का पोहोचेल असे वर्तन करु शकत नाही.
2. सरकारी कामकाजाचे विनियमन व शिस्तबद्धता निर्देश (Conduct Guidelines)
कार्यालयीन वेळ, साधने व जागेचा वापर फक्त शासकीय उद्देशासाठीच केला जावा.
3. सरकारी साधनांचा गैरवापर
सार्वजनिक साधनांचा (बिजली, साफसफाई, स्टाफ वेळ इ.) वैयक्तिक कामासाठी वापर हा शासकीय धोरणांना विरोधात आहे.
आपल्या कार्यालयामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना लेखी आदेश निर्गमित करावेत की, कार्यालयीन वेळेत वाढदिवस व इतर वैयक्तिक कार्यक्रम साजरे करणे हे निषिद्ध आहे. अशा प्रकारांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल, याचे स्पष्ट निर्देश द्यावेत. सर्व कार्यालयांना यासंबंधी सूचना फलक लावण्यास सांगावे. अशी मागणी रत्नागिरी माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर यांनी केली आहे.आपण सदर निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. व तसे लेखी पत्राद्वारे मला कळवून उलट टपाली मला एक प्रत देण्यात यावी.
व तातडीने आपल्या स्तरावून तसे संबंधित सर्व शासकीय आस्थापनाना आदेश पारित करावेत.अशी मागणी केलेली आहे.

Author: Yogesh Pedhambkar
योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी