महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द! मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली घोषणा.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द! मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली घोषणा.

मुंबई ~ महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू असलेला वाद आता संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत, हिंदी भाषेसंबंधीचे १६ एप्रिल २०२५ आणि १७ जून २०२५ रोजीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीबाबत सखोल विचार करण्यासाठी राज्य सरकारने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. डॉ. जाधव हे माजी कुलगुरू आणि नियोजन आयोगाचे सदस्य असून, शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. ही समिती त्रिभाषा सूत्रामध्ये तिसरी भाषा कोणत्या वर्गापासून लागू करावी, ती कशा प्रकारे शिकवावी आणि विद्यार्थ्यांना कोणते पर्याय उपलब्ध असावेत, यावर विचार करून आपला अहवाल सादर करेल. समितीच्या इतर सदस्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या समितीच्या अहवालानंतरच त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक घटकांना दिलासा मिळाला आहे.

#MaharashtraNews #HindiLanguage #DevendraFadnavis #MaharashtraGovernment #MarathiNews #EducationPolicy #DrNarendraJadhav #Ma

rathi

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...


error: Content is protected !!