रत्नागिरीतील सनसेट पॉईंटवर तरुणी रेलिंगवरून कोसळली; पालकमंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल!
रत्नागिरी: रत्नागिरीतील प्रसिद्ध भगवती किल्ल्याजवळील सनसेट पॉईंट येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. रेलिंगच्या बाहेर बसल्याने एक तरुणी खाली कोसळल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, ना. उदय सामंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.
प्रशासनाकडून पावसाळ्याचे दिवस असल्याने धोकादायक ठिकाणी न जाण्याचं आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र, काही पर्यटक या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. ना. उदय सामंत यांनी या घटनेनंतर नागरिक आणि पर्यटकांना विशेष आवाहन केलं आहे.
ते म्हणाले, “आपल्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने कोणत्याही धोकादायक ठिकाणी जाणं टाळा. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा. आपली एक चुकीची कृती मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते.”
#रत्नागिरी #SunsetPoint #UdaySamant #अपघात #सुरक्षितता #पावसाळा #प
र्यटन

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.