मनसे गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते माध्यमिक शाळा वाघांबे येथे शैक्षणिक साहित्य वाटप
गुहागर, दोडवली: शुक्रवार, २८ जून २०२५ रोजी गुहागर तालुक्यातील माध्यमिक शाळा वाघांबे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) गुहागर संपर्क अध्यक्ष श्री. प्रमोद गांधी यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पंचक्रोशीतील दोडवली, चिंद्रावले, वाघांबे आणि कर्दे येथील माध्यमिक विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
यावेळी श्री. प्रमोद गांधी यांच्यासोबत मनसेचे सह संपर्क प्रमुख श्री. सुरेंद्र निकम, विभाग अध्यक्ष श्री. अविनाश निकम, दोडवली मनसे अध्यक्ष श्री. अशोक कांबळे, शाखा अध्यक्ष श्री. सचिन निकम आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य श्री. संजय हुमणे आणि श्री. राजेश कांबळे, तसेच शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती शुभांगी रामगडे यांचीही या सोहळ्याला विशेष उपस्थिती होती. शिक्षक, पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळांचे आभार मानण्यात आले. तसेच, नवीन शैक्षणिक वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
साभार: डी.जे. सचिन कुळये, तवसाळ
#मनसे #प्रमोदगांधी #शैक्षणिकसाहित्यवाटप #माध्यमिकशाळावाघांबे #गुहागर #दोडवली #मनसेगुहागर #विद्यार्थी #शिक्षण #महाराष्ट्रनवनिर्माणसेना

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.