नागपूर येथील श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलन प्रचार दौरा नांदेड येथे संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नागपूर येथील श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलन प्रचार दौरा नांदेड येथे संपन्न

नांदेड: आगामी श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलनाच्या तयारीसाठी रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी नांदेड येथे गोदावरी नदीकाठी असलेल्या श्री संत नामदेव महाराज मंदिरात विचारमंथन बैठक आणि प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता.

या बैठकीत संमेलनाचे पदाधिकारी श्री. भास्कर टोम्पे, श्री. ईश्वर धिरडे आणि श्री. अनंत जागजोड यांनी संमेलनाविषयी सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन केले. यावेळी समाजाच्या वतीने विश्वस्त अध्यक्ष श्री. शंकर सिंगेवार यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

नांदेड मेरू शिंपी समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवांना नागपूर येथे होणाऱ्या संमेलनाला सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संमेलनाला भारताचे लाडके आणि यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी यांची उपस्थिती राहणार आहे, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहतील. देश-विदेशातून भाविक या संमेलनाला उपस्थिती दर्शवतील अशी अपेक्षा आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण संगेवार यांनी केले, तर सूत्रसंचालन मिलिंद सिंगेवार यांनी केले.

या कार्यक्रमाला श्री. विनोद सिंगेवार, विजय अण्णा यन्नावार, ज्येष्ठ समाजसेवक शंकर तुंगेनवार, गजानन पोटपेलवार, अभय भुरेवार, दीपक जलावार, रुपेश सिंगेवार, किशोर तुंगेनवार, चंद्रकांत तुंगेनवार, गंगाधर नोमुलवार, किशोर नोमुलवार, रमाकांत रांपतवार, साईनाथ यन्नावार, अश्विन रॉयलवार, लक्ष्मीकांत रायलवार, बबनराव रायलवार, अजय सिंगेवार, अंकुश सिंगेवार, विनोद टेभुरणेवार, संजीव तुंगेनवार, शंकर मगडेवार, राम शिरडकर, अमोल साखरेकर, मोहन साखरेकर, गौरव कुंटूरवार, धोंडीबा सुरावार, गजानन तुंगेनवार, गजानन यन्नावार, गंगाधर मोरगुलवार, श्रीकांत दरबस्तवर, जनार्धन पोटपेलवार, राम शिरडकर, दीपक जलावार, गजानन तुंगेनवार, गणेश घोडेगावकर, अरविंद पोटपेलवार, सतीश सिंगेवार, तसेच श्रीमती विजया पेंडलवार, सौ. सुनंदा मुरगुलवार, सौ. सुनंदा दलबस्तवार, सौ. संदीपा टेभुरनेवार, सौ. पुनम यन्नावार, सौ. अंजली भुरेवार, सौ. लक्ष्मीबाई रॉयलवार, सौ. ज्योती पोटपेलवार, सौ. ललिता दरबस्तवार यांसह मोठ्या संख्येने समाज बांधव, भगिनी आणि मित्र परिवार उपस्थित होता.

ही बातमी श्री. संतोष मुळे यांनी दिली.

#SantNamdevMaharaj #NagpurConvention #Nanded #MeruShimpiSamaj #NationalUnity #NarendraModi #CommunityEvent #JaiNamdev #ChaloNagpur

#श्रीसंतनामदेवमहाराज #नागपूरसंमेलन #नांदेड #मेरूशिंपीसमाज #राष्ट्रीयएकात्मता #नरेंद्रमोदी #समाजकार्यक्रम #जयनामदेव #चलोनागपूर

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...


error: Content is protected !!