महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक: ‘मी मराठी’ टोपी घालून सरकारला घेरले!
मुंबई: आज सोमवारपासून (३० जून २०२५) सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस विरोधकांनी गाजवला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना (ठाकरे गट) विशेषतः आक्रमक झाल्याचे दिसून आले. विरोधी पक्षाचे अनेक नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर ‘मी मराठी’ लिहिलेली टोपी घालून सरकारच्या विरोधात घोषणा देत होते.
विधानभवनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच शिवसेना (ठाकरे गट) आमदार ‘मी मराठी’ टोपी घालून विधान भवनाच्या पायऱ्यांवर दाखल झाले. या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना स्वतः ‘मी मराठी’ लिहिलेली टोपी घातली. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात हस्तांदोलनही झाले, जो चर्चेचा विषय ठरला. भास्कर जाधव आणि अजय चौधरी हे देखील याच ‘मी मराठी’ टोपीमध्ये उपस्थित होते.
दुसरीकडे, विधानसभेत आज मुख्यमंत्र्यांनी नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय करून दिला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश पटलावर ठेवला जाणार आहे. तसेच २०२५-२६ च्या पुरवणी मागण्याही सादर केल्या जातील. शोक प्रस्ताव मांडल्यानंतर आजचे कामकाज संपणार आहे.
#MaharashtraAssembly #MonsoonSession #OppositionProtest #MiMarathi #ShivSenaUddhavBalasahebThackeray #ChandrashekharBawankule #AmbadasDanve #AdityaThackeray #MaharashtraPolitics
#महाराष्ट्रअधिवेशन #पावसाळीअधिवेशन #विरोधकांचाआक्रोश #मीमराठी #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #चंद्रशेखरबावनकुळे #अंबादासदानवे #आदित्यठाकरे #महाराष्ट्ररा
जकारण

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.