भंडारी समाज उपकोषाध्यक्ष चेतन बोवलेकर यांचा विशेष सत्कार; “रावबहादूर सीताराम केशव तथा बाबासाहेब बोले” जयंतीनिमित्त उपक्रम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

मुंबईत कित्ते भंडारी मंडळाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!

भंडारी समाज उपकोषाध्यक्ष चेतन बोवलेकर यांचा विशेष सत्कार; “रावबहादूर सीताराम केशव तथा बाबासाहेब बोले” जयंतीनिमित्त उपक्रम

 

मुंबई : कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी, दादर यांच्या वतीने “रावबहादूर सीताराम केशव तथा बाबासाहेब बोले” यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.

 

शिबिरात अनेक गरजू नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. या उपक्रमास भंडारी समाज संस्था, वसई तालुक्याचे उपकोषाध्यक्ष श्री. चेतन बोवलेकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यांच्या समाजकार्याबद्दल त्यांचा सत्कार मंडळीचे सहकार्यवाह श्री. संतोष बाबुराव मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व स्वयंसेवकांचे विशेष कौतुक करण्यात आले.

 

हॅशटॅग:

#कित्तेभंडारीमंडळ #आरोग्यतपासणी #मुंबईसमाजकार्य #भंडारीसमाज #ChetanBovlekar #SantoshManjrekar #समाजसेवा #MumbaiNews

 

 

Sujit Surve
Author: Sujit Surve

Sujit surve * Ratnagiri vartahar* Digital news Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...


error: Content is protected !!