गिरणी कामगारांचा निर्णायक लढा! ९ जुलै रोजी भायखळा ते आझाद मैदान मोर्चा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 


🏠 गिरणी कामगारांचा निर्णायक लढा! ९ जुलै रोजी भायखळा ते आझाद मैदान मोर्चा

“नको वांगणी… नको शेलू… हवे मुंबईतच घर!”


मुंबई : मुंबईतील गिरणी कामगारांच्या घराच्या हक्कासाठीचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आला असून, राज्यातील १४ गिरणी कामगार संघटना एकत्र येत ‘गिरणी कामगार संयुक्त लढा समिति’ची स्थापना करण्यात आली आहे. या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर ०९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भायखळा राणीबाग येथून आझाद मैदानापर्यंत भव्य लाँगमार्च मोर्चा काढण्यात येणार आहे.

२७ जून रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी मोर्चाची अधिकृत घोषणा केली. ते म्हणाले, “गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घराच्या प्रश्नावर आता अंतिम आणि निर्णायक लढा दिला जाणार असून, हा लढा जिंकायचाच आहे!


📢 “मुंबईतच घर देणं सरकारची जबाबदारी!”

सध्या सरकारकडून शेलू, वांगणी यांसारख्या मुंबईबाहेरील ठिकाणी पुनर्वसनाचा पर्याय देण्यात येत आहे, पण बहुतांश कामगारांनी याला तीव्र विरोध केला आहे. “मुंबईत आयुष्य घालवले, काम केले आणि आता घर देताना बाहेर ढकलले जात आहे,” असा संताप कामगारांमध्ये आहे.

याशिवाय, अनेक वंचित कामगार व त्यांच्या वारसांचा अर्ज प्रक्रियेतून वगळला गेलेला आहे. तसेच १९८१ च्या संपातील आठ गिरण्यांतील कामगारांचा मुद्दाही या लढ्याचा भाग बनला आहे.


📝 कामगारांच्या प्रमुख मागण्या :

१५ मार्च २०२४ चा सरकारचा निर्णय त्वरित रद्द करावा / बदलावा
सर्व पात्र कामगारांना मुंबईतच मोफत घरे द्यावीत
कालबद्ध आराखडा जाहीर करून ‘इरादा पत्र’ वाटप करावे
वेळेत घरे न दिल्यास सरकारने नुकसानभरपाई द्यावी
संपूर्ण वंचित कामगारांना प्रक्रियेत सामावून घ्यावे


🤝 सर्व स्तरातील लोकांनी समर्थन द्यावे – आवाहन

समितीने सर्व गिरणी कामगार, त्यांच्या कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य मुंबईकरांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “मुंबईच्या समृद्धीत योगदान देणाऱ्या कामगारांना आज रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे,” असा संतापही व्यक्त झाला.

“९ जुलैचा मोर्चा सरकारच्या दरवाजात हक्काची जोरदार ठणाणा करणार!”


📸 फोटो


📲हॅशटॅग्स :

#गिरणीकामगार #गिरणीकामगारांचा_लढा #गिरणीकामगार_मोर्चा #मुंबईतच_घर_हवे #महाराष्ट्रशासन #कामगारसंघटना #१४संघटना #गिरणीकामगार_संयुक्त_लढा #मोर्चा_९जुलै #कामगारन्याय #मुंबई_मोर्चा #गिरणीकामगारआंदोलन #घराचा_हक्क #NTCजमीन #घर_मिळालंच_पाहिजे


✍️ – रत्नागिरी वार्ताहर

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...


error: Content is protected !!