🔴 ठाकरे गटात धसका; शिंदे गटात मोठा प्रवेश, अनेक नेते-पदाधिकारी झाले सामील!
मुंबई | प्रतिनिधी: विधानसभेनंतर आता ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. राज्यभरातून पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. अनेक जुने आणि सक्रिय पदाधिकारी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत थेट शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची ताकद अधिक बळकट होत आहे.
यामुळे ठाकरे गटात नाराजीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं असून गटातील अनेकजण आंतरिक पातळीवर नाराज असल्याचं चित्र आहे.
📍पुणे आणि ठाण्यात मोठी गळती
पुणे जिल्ह्यातील मंचर, अहिल्यानगर तसेच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून ठाकरे गट, काँग्रेस, मनसे व रिपब्लिकन पक्षाचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. या सर्वांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला.
एकनाथ शिंदे यांनी याबाबत एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत सांगितले की, “सर्व नवप्रवेशितांचे मन:पूर्वक स्वागत! त्यांच्या भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!”
🚨 आगामी निवडणुकांवर परिणाम?
ठाकरे गटातून होत असलेल्या गळतीमुळे आगामी महापालिका व स्थानिक निवडणुकांत त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. तर दुसरीकडे शिंदे गट ही संधी साधत संघटन बळकटीकडे वाटचाल करत आहे.
📲 Hashtags:
#ShivSena #EknathShinde #UddhavThackeray #PoliticalShift #MaharashtraPolitics #ThackerayGroup #ShindeGroup #MahapalikaElection2025 #PunePolitics #UlhasnagarNews #LokmatNews #MarathiNe

Author: Prachi Sutar
Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.