परळमध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

परळमध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी!

मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

नवी मुंबई (मंगेश जाधव वेळबंकर):

मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने परळ (मुंबई) येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. २६ जून २०२५ रोजीच्या जयंतीचे औचित्य साधून, रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी बौद्धजन पंचायत समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, भोईवाडा, परळ येथे हा मंगलमय सोहळा पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलित करून करण्यात आली. अगरबत्तीच्या सुवासाने आणि सामुदायिक बुद्ध वंदनेने सभागृहात धम्ममय वातावरण निर्माण झाले.

यानंतर, संगीतमय कार्यक्रमाला प्रारंभ झाला. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आदरणीय नितेश कासारे यांनी बुद्ध आणि भीमाला वंदन करणाऱ्या दमदार गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर, सुप्रसिद्ध गायिका कोकणकन्या तेजस्विनी कांबळे यांनी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त एक प्रेरणादायी गीत गायले, तसेच ‘MDSP गौरव’ हे सुंदर गाणेही सादर केले. सुप्रसिद्ध गायक दिनेश सावंत यांनीही शाहू महाराजांवर आधारित एक गीत गायले. MDSP चे सचिव, सुप्रसिद्ध कवी आणि गायक उज्ज्वल खैरे यांनी आपल्या लेखणी आणि गायकीतून ‘शाहू राजा कसा होता’ हे प्रभावीपणे सादर केले. नवोदित गायक हार्दिक कासारे यांनी रमाई गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कलाकारांना बेंजो वादक सुदेश जाधव, तबला वादक समीर महाडिक, ढोलक वादक साहिल घाडगे, आणि हार्मोनियम वादक हार्दिक कासारे यांची सुरेख साथ लाभली, ज्यामुळे वातावरण पूर्णपणे संगीतमय झाले.

यानंतर, MDSP चे सचिव उज्ज्वल खैरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय सुमेध सकपाळ यांची निवड केली, ज्यास उपसचिव आदरणीय तुषार नेवरेकर यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले. अध्यक्षपद स्वीकारल्यावर माजी सचिव आदरणीय राहुल अहिरे साहेबांनी प्रास्ताविक सादर केले आणि उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आदरणीय महेंद्र चाफे सरांनी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती अगदी कमी वेळात प्रभावीपणे दिली. त्यानंतर, १०वी, १२वी आणि पदवीधर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, ज्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा, ऊर्जा आणि बळ मिळाले.

सामाजिक, धार्मिक आणि आंबेडकरी चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सत्कारमूर्ती बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय लक्ष्मण भगत साहेब, बहुजन हितवर्धक कला संस्थेचे अध्यक्ष, बौद्धचार्य कवी गायक आदरणीय संतोष गमरे साहेब, विचारवंत आणि हुशार व्यक्तिमत्व आदरणीय महेंद्र चाफे सर, आणि शालेय शैक्षणिक जीवनात अग्रेसर असणारी अर्पिता खैरे यांचा MDSP च्या वतीने सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यानंतर, मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि अध्यक्षांचे भाषण झाले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या सर्व युवकांनी अथक परिश्रम घेतले. उपस्थित सर्वांचे आभार ॲड. सुरेंद्र मर्चंडे यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

#Shahujayanti #लोकराजाशाहूमहाराज #PerelCelebration #सामाजिकप्रतिष्ठान #नवीमुंबई #DrAmbedkar #GautamBuddha #CulturalEvent #Jayanti #MumbaiEvents #सामाजिककार्य #मराठीबातम्या #MDSP #MaharajJayanti #सामाजिकएकता #महाननेते #प्रेरणादायी

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...


error: Content is protected !!