तवसाळ – तांबडवाडी – बाबरवाडी मार्गावर ST सेवा अखेर पुन्हा सुरू!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तवसाळ – तांबडवाडी – बाबरवाडी मार्गावर ST सेवा अखेर पुन्हा सुरू!

ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे रस्ता डागडुजी आणि एसटी सेवा पूर्ववत; विद्यार्थी आणि ग्रामस्थ आनंदित

गुहागर | तवसाळ – अखेर ग्रामस्थांचा पाठपुरावा यशस्वी ठरला असून, तवसाळ-तांबडवाडी-बाबरवाडी मार्गावरील ठप्प झालेली एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. २८ जून २०२५ रोजी महिलामंडळ आणि ग्रामस्थांनी रस्ता डागडुजी केल्यानंतर लगेचच गुहागर आगारात अर्ज दाखल करून सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याच दिवशी सायंकाळपासून एसटी फेरी सुरू झाली, हे विशेष!

या मोहिमेत ग्रामसेवक श्री अशोक घडशी, मा. सरपंच सौ. नम्रता निवाते, सामाजिक कार्यकर्ते श्री विजय मोहीते, विजय नाचरे, रमेश कुरटे, शंकर वाघे, प्रकाश घाणेकर, तसेच संदीप जोशी, चंद्रकांत पवार, गणेश कुरटे, जागृती पाडदळे, निकिता येद्रे आदींनी पुढाकार घेतला.

ग्रामपंचायतीकडून तातडीने रस्ता दुरुस्तीनंतर एसटी सेवा सुरू होणे ही आदर्शवत कामगिरी ठरली आहे. ग्रामसेवक श्री घडशी यांनी दिलेला शब्द पाळून ग्रामस्थांच्या गैरसोयीवर कायमचा तोडगा दिला.

एसटी सेवा सुरू झाल्याने विद्यार्थी व नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. गावपातळीवर घेतलेल्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, रोहिले ते तवसाळ-तांबडवाडी-बाबरवाडी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या मार्गासाठी चाकरमानी आदर्श नवतरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळ मागील ७-८ वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. मात्र, अजूनही फक्त आश्वासने मिळत असून २०२५-२६ मध्ये रस्ता न झाल्यास वाहतुकीस धोका निर्माण होऊ शकतो, अशी स्पष्ट भूमिका श्री. सचिन कुळये (तवसाळ-तांबडवाडी) यांनी मांडली आहे.

🔖 #TavasalTambadwadi #STBusServiceRestarted #GuhagarNews #RatnagiriUpdates #MarathiNews #TavasalDevelopment #KonkanConnectivity #गुहागर #तवसाळ #तांबडवाडी #बाबरवाडी #एसटीसेवा #कोकण

🖼️ फोटो

Sujit Surve
Author: Sujit Surve

Sujit surve * Ratnagiri vartahar* Digital news Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...


error: Content is protected !!