नाटे पोलीस ठाण्याचे श्री. संजय झगडे साहेब यांना उपनिरीक्षक पदी बढती
✍️ राजू सागवेकर /राजापूर
नाटे सागरी पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत सागवे पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय बाळकृष्ण झगडे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती झाली आहे. त्यांचा सन्मान रत्नागिरी जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा. जयश्री गायकवाड यांच्या हस्ते स्टार लावून करण्यात आला.
श्री.संजय झगडे यांच्या या यशाबद्दल नाटे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.श्री.अश्वनाथ खेडकर साहेब, सर्व पोलीस सहकारी, आणि सर्व पोलीस पाटील मंडळींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
त्यांची मेहनत, कर्तव्यनिष्ठा व शांत स्वभावामुळे त्यांनी पोलीस दलात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सर्वानुमते हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Author: Sujit Surve
Sujit surve * Ratnagiri vartahar* Digital news Media creators