शक्तिपीठ महामार्ग आंदोलन: राजू शेट्टींसह ४०० जणांवर कोल्हापुरात गुन्हे दाखल
उद्या पांडुरंगास साकडे घालून महामार्ग रद्द करण्याची मागणी करणार
कोल्हापूर: शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत आंदोलन केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह सुमारे ४०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
या आंदोलनात माजी आमदार ऋतुराज पाटील, राजू आवळे, शिवसेनेचे नेते विजय देवणे यांचाही समावेश आहे. शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते, ज्यात चक्का जामचाही समावेश होता. बंदीचे आदेश असतानाही जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे की, उद्या, बुधवारी ४ जुलै रोजी पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाला साकडे घालण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ जुलै रोजी पंढरपूर येथे शासकीय पूजा करणार आहेत. त्याआधी, मुख्यमंत्र्यांना राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी आणि राज्यातील जनतेवर व शेतकऱ्यांवर अन्यायकारक शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी मिळावी, अशी प्रार्थना पांडुरंगाकडे केली जाईल, असे शेट्टी यांनी सांगितले.
Hashtags:
* #ShaktipithMahamarg
* #RajuShetti* #KolhapurNews* #FarmersProtest* #शक्तीपीठमहामार्ग * #राजूशेट्टी * #शेतकरीआंदोलन
* #कोल्हापूर * #Pandharpur* #पंढरपूर * #MaharashtraPolitics* #BreakingNewsMarath
i
* #किसानआंदोलन

Author: Sujit Surve
Sujit surve * Ratnagiri vartahar* Digital news Media creators