महात्मा फुले यांच्यामुळेच शिक्षण सर्वांसाठी: डॉ. मनोज पाटील

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महात्मा फुले यांच्यामुळेच शिक्षण सर्वांसाठी: डॉ. मनोज पाटील

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या दूरदृष्टीमुळे सामान्य माणसाला शिक्षणाची दारे खुली झाली आणि प्रगतीची संधी मिळाली, असे प्रतिपादन मुख्याध्यापक डॉ. मनोज पाटील यांनी केले.

वेळदूर, नवनगर: क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबाराव फुले यांनी ३ जुलै १८५२ रोजी बहुजन समाजासाठी पुण्यात शाळा स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्यामुळे आज सर्वसामान्यांना शिक्षणाचे दरवाजे उघडले आणि प्रगतीची संधी मिळाली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, वेळदूर नवनगर मराठी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. मनोज पाटील यांनी केले. महात्मा फुले यांच्या या क्रांतीकारी निर्णयाचे स्मरण करण्यासाठी शाळेत आयोजित ऐतिहासिक दिनानिमित्त ते बोलत होते.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी जानवी हरचकर, शिक्षकवृंद अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला, विद्यार्थी प्रतिनिधी अनिश पालशेतकर, आरोही रोहीलकर तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने पदाधिकारी जानवी हरचकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान, धन्वंतरी मोरे, अफसाना मुल्ला, सुषमा गायकवाड, अंजली मुद्दमवार आणि अनेक विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाच्याच दिवशी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका धन्वंतरी मोरे यांचा वाढदिवस देखील अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अफसाना मुल्ला यांनी केले.

 

#MahatmaPhule #EducationForAll #शिक्षणक्रांती #DrManojPatil #JPSchoolVeldoor #बहुजनशिक्षण #फुलेजयंती #शिक्षणाचेमहत्व #ProgressThroughEducation

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...


error: Content is protected !!