शुभमन गिलचं ऐतिहासिक द्विशतक; इंग्लंडच्या भूमीत भारतीय कर्णधार म्हणून सर्वोच्च धावसंख्या
बर्मिंघम : शुभमन गिल याच्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाने बर्मिंघम कसोटीत भक्कम स्थिती गाठली आहे. भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची धुरा मिळाल्यानंतर गिलनं आपल्या कामगिरीतून निवड समितीचा निर्णय योग्य ठरवला आहे. 311 चेंडूत 21 चौकार आणि 2 षटकारांसह गिलनं जबरदस्त 200 धावांची खेळी साकारली.
डावाच्या सुरुवातीला यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या साथीनं गिलनं महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचत संघाला समाधानकारक धावसंख्येकडे नेलं. या द्विशतकासह शुभमन गिलनं इंग्लंडमध्ये भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी हा विक्रम मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या नावावर होता, ज्यांनी 1990 मध्ये 179 धावा केल्या होत्या.
शुभमन गिलच्या या पराक्रमी खेळीमुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत असून सामन्याच्या पुढील टप्प्यांमध्ये विजयाच्या दिशेने पावले टाकतो आहे. गिलचं हे द्विशतक भारतीय क्रिकेटसाठी एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरणार आहे.

Author: Sujit Surve
Sujit surve * Ratnagiri vartahar* Digital news Media creators