अंजनवेल विद्यालयात गुहागर आगार प्रमुख श्री. अशोक चव्हाण यांचा विशेष सत्कार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 अंजनवेल विद्यालयात गुहागर आगार प्रमुख श्री. अशोक चव्हाण यांचा विशेष सत्कार

 

तळवली (मंगेश जाधव वेळबंकर)

तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान संचालित दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय आणि भगिर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज, अंजनवेल, तालुका गुहागर येथे गुहागर आगार प्रमुख श्री. अशोक चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यालयातील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर आगाराचे व्यवस्थापक श्री. अशोक चव्हाण उपस्थित होते. अंजनवेल विद्यालय परिसरातील वेलदूर गावात अनेक वर्षांपासून एसटी सेवा सुरू नव्हती. यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना अनेक वर्षे पायी प्रवास करावा लागत होता. विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. मात्र, अंजनवेल विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश गोरिवले आणि वेलदूर गावातील सामाजिक कार्यकर्ते यांचा सततचा पाठपुरावा चालू होता. विद्यार्थी हित लक्षात घेऊन आगार प्रमुख श्री. अशोक चव्हाण यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला, ज्यामुळे अखेर एसटी बस सेवा सुरू झाली आहे. याचनिमित्ताने आगार प्रमुख यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात वेलदूर, घरटवाडी, जावळेवाडी येथे आगार व्यवस्थापक श्री. चव्हाण यांच्या विशेष सत्काराने झाली. त्यानंतर अंजनवेल विद्यालयात झांज पथक वाजवून आगार व्यवस्थापक यांचे भव्य स्वागत करण्यात आले. श्री. चव्हाण यांच्या हस्ते इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. श्री. चव्हाण यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आगार व्यवस्थापक श्री. चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, तालुक्यात कोणताही विद्यार्थी एसटीमुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही. गावागावात बस सेवा सुरू करून विद्यार्थी आणि शिक्षण यांचे नाते घट्ट करून कोकणातून प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावेत, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उदय दामले यांनी केले, तर आभार सौ. दिपाली कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

#गुहागरST #अंजनवेलविद्यालय #अशोकचव्हाण #विद्यार्थीगुणगौरव #बससेवा #शिक्षणाचेमहत्व #KonkanNews #Guhagar #EducationForStudents #MarathiNews #एसटीबस #StudentsSuccess #Veldoor #Mang

eshJadhav

Reporters
Author: Reporters

Guhagar Office * Ratnagiri vartahar* Digital news Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...