नांगरणी स्पर्धा :
गुहागरमध्ये जय सोन साळवी ॲग्रो मंडप डेकोरेटर्सतर्फे भव्य नांगरणी स्पर्धा
सोमवारी जय सोन साळवी ॲग्रो मंडप डेकोरेटर्स प्रकाश पांडुरंग साळवी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त नांगरणी स्पर्धांचे आयोजन
आबलोली (संदेश कदम)
जय सोन साळवी ॲग्रो मंडप डेकोरेटर्स प्रकाश पांडुरंग साळवी
यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त
दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी नांगरणी स्पर्धा गुहागर तालुक्यातील जमसूत , सहाणे च गावण जामसुत येथे आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ९ ते १२ वा. या वेळेत पेट्रोल पावर विडर नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आले असून यासाठी खालील प्रमाणे…
प्रवेश फी – ३००/- असून प्रथम क्रमांकास २५०१ रुपये द्वितीय क्रमांकास १५०१ रुपये, तृतीय क्रमांक १००० रुपये. त्याचप्रमाणे दुपारी. १ वा. भव्य गावठी जोडी नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आले असून यासाठी प्रवेश फी ५०० रुपये प्रथम क्रमांकास ५ हजार ५५५ रुपये, द्वितीय क्रमांक ४ हजार एक रुपये, तृतीय क्रमांकात ३ हजार एक रुपये, चतुर्थ क्रमांकास २ हजार एक, पाचव्या क्रमांकास १ हजार एक रुपये ,रात्रौ ७.३० वा.स्नेहभोजन होणार आहे तरी या नागरणी स्पर्धेसाठी संपर्क – प्रकाश साळवी, संतोष साळवी, शैलेश साळवी, अजित साळवी यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
#नांगरणीस्पर्धा #गुहागर #आबलोली #प्रकाशसाळवी #कृषीस्पर्धा #शेतकरी #मराठीबातम्या #jamasut #guhaagrnews