खोडदे गावाच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजेंद्र अनंत साळवी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खोडदे गावाच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजेंद्र अनंत साळवी

 

ग्रामसभेत सर्वानुमते अविरोध निवड; पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव

 

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अनंत साळवी यांची खोडदे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सर्वानुमते व अविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर राजेंद्र साळवी यांच्यावर ग्रामस्थ व पंचक्रोशीमधून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साळवी यांच्या निवडीबद्दल खोडदे ग्रामपंचायतच्या सरपंच कुमारी पूजा गुरव, ग्रामपंचायत सदस्य नाना साळवी, आबलोली-खोडदे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पंढरीनाथ साळवी, सामाजिक कार्यकर्ते विलास गुरव, विनायक गुरव, संतोष गुरव,ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी  ग्रामपंचायत कर्मचारी नितीन मोहिते, वैभव निवाते यांनी विशेष अभिनंदन केले.

राजेंद्र अनंत साळवी यांच्या नेतृत्वाखाली गावातील वादविवाद तंटे सामंजस्याने मार्गी लागतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.


 

 

🔖 हॅशटॅग्स :

 

#खोडदेकुरुद #तंटामुक्तीसमिती #गुहागर #सामाजिककार्य #RatnagiriNews #रत्नागिरीवार्ताहर

 

📸 फोटो

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...