📰 ग्रामपंचायत काताळे तंटामुक्ती अध्यक्षपदी विजय मोहिते यांची निवड
ग्रामसभेत एकमताने निवड; मान्यवरांच्या उपस्थितीत अभिनंदनाचा वर्षाव
गुहागर : निर्मल ग्रामपंचायत काताळे येथील आज झालेल्या ग्रामसभेत श्री. विजय मोहिते यांची एकमताने तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीदरम्यान ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामसभेला ग्रामसेवक अशोक घडशी, जि .प. सदस्य महेशजी नाटेकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शंकर येद्रे, अमोल सुर्वे, दिप गडदे, उपसरपंच प्रसाद सुर्वे, पोलिस पाटील सचिन रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या निवडीनंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विजय मोहिते यांचे हार्दिक स्वागत केले व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. पुढील कामकाजासाठी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बातमी साभार ~ सचिन Dj.
रत्नागिरी वार्ताहर डिजीटल कडून देखील विजय मोहिते यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🙏
🔖 हॅशटॅग्स :
#Ratnagiri #Guhagar #Kataley #Grampanchayat #Tantamukti #VijayMohite #रत्नागिरीवार्ताहर
📸 फोटो