गणेशोत्सवात पालखी देखावा,एक पेड मा के नाम संदेश, सजावटीतून मराठी भाषा गौरव व संवर्धन संदेश.
शेळवीवाडी (हर्चे) ता.लांजा जि. रत्नागिरी येथील तोडणकर परिवारातील श्री हर्षद तोडणकर दरवर्षी गणेशोत्सवात नाविन्यपूर्ण देखावे सादर करतात. यावर्षीही त्यांनी घरगुती गणपती सजावटीत कोकणातील पालखीचा देखावा यातून गणरायाचे आगमन दाखवले आहे.एक पेड मा के नाम हा गणेशजींचा संदेश चित्र देखावा दाखवला आहे. यात माणसा माणसा एक तरी झाड लाव. असा पर्यावरण जागृतीचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. तसेच मराठी भाषा गौरव, संवर्धन संदेश देणारा माहिती देखावा तयार करण्यात आला आहे.
या देखाव्यासाठी त्यांनी पर्यावरण पूरक साहित्य म्हणजेच पुठ्ठा, कागद यांचा वापर केला आहे. या तीनही संकल्पनेतून समाज जागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या देखाव्याविषयी परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.