गुहागर तालूका नाभिक समाज संघातर्फे वारकरी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील व्याडेश्वर सभागृह गुहागर येथे गुहागर तालुका नाभिक समाज संघातर्फे वारकरी सांप्रदाय मधील थोर संत सेना महाराज यांची पुण्यतिथी गुहागर तालुका नाभिक समाज संघाचे अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्यायडेश्वर गुहागर सभागृह येथे विविध उपक्रमांनी नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर नाभिक समाजातील वृत्त व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी
प्रस्तावना मनोहर पवार गुरूजी यांनी केली तर सूत्रसंचालन योगेश भोसले यांनी केले. यावेळी १} सौ.मेघा मनोहर पवार . विस्तार अधिकारी दापोली.
२} श्रीकांत शिवराम टक्के .
विना अपघात सेवा .गुहागर आगार
३} विवेक शिवराम टक्के .
विना अपघात सेवा.गुहागर आगार.
४} प्रदीप शांताराम पवार.
निवृत्त शिक्षक .जि.प. रत्नागिरी.
५} श्रीकांत सहदेव कदम.
निवृत्त शिक्षक. कोळवली हायस्कूल.
६} योगेश राजाराम भोसले.
ग्रामपंचायत कर्मचारी. निर्मल ग्रामपंचायत आबलोली.
७} सौ.समृद्धी सुधीर कदम .
अंगणवाडी सेविका.गुहागर जांगळेवाडी.
८} कु.दिक्षा दिपक भोसले .
तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक.
९} मनोहर रामचंद्र पवार.
निवृत्त शिक्षक. जि.प.रत्नागिरी या सर्व समाज्यातील विविध क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरवण्यात आले.
तसेच महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये 1} मेणबत्ती पेटविणे. २} संगित खुर्ची. ३} खेळ पैठणीचा आणि लहान मुलांसाठी संगित खुर्ची तसेच पारंपरिक रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेतही बहूसंख्येने सहभाग घेण्यात आला. त्यानंतर चिपळूण येथील सोनी सर यांनी रजिस्ट्रेशन बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर समाज संघाचे अध्यक्ष श्री.संजय पवार यांनी समाजाच्या जडणघडणी बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी श्रीकांत कदम सर व परिवार यानी उपस्थित सर्वाच्या भोजनाची तसेच हॉलची उत्तम व्यवस्था केली.आशिष भोसले व परिवार यांनी प्रसाद व नाष्ट्याची व्यवस्था केली तर सौ.शारदा शिंदे व परिवार यांनी चहाची व्यवस्था केली होती तसेच संतोष आंबे यांनी स्पीकरची व्यवस्था केली होती.शेवटी समाज संघाचे सचिव आशिष भोसले यांनी सर्वाचे आभार मानले.