प्रथम वर्धापन दिन सोहळा: तवसाळ ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी मंदिराचा उत्सव जल्लोषात

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

प्रथम वर्धापन दिन सोहळा: तवसाळ ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी मंदिराचा उत्सव जल्लोषात

तवसाळ, ता. गुहागर :
तवसाळ गाव पंचक्रोशीचे जागृत देवस्थान व ग्रामदैवत श्री महामाई सोनसाखळी देवीच्या नव्या मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त चार दिवसीय धार्मिक महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. अरबी समुद्र आणि शास्त्री नदीच्या संगमाजवळ, डोंगर-दऱ्यांच्या कुशीत वसलेल्या या पवित्र स्थळी उभारण्यात आलेले भव्य-दिव्य मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.

नूतनीकरणानंतर उभारलेल्या मंदिराच्या कलशारोहणाच्या स्मरणार्थ आयोजित या उत्सवात विविध धार्मिक विधी, भजन, पूजन आणि महाप्रसाद यांचा समावेश होता.
शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी षोडशोपचार पूजा तर सायंकाळी देवीचे अलंकार पूजन (रूप लावणे) करण्यात आले. रात्री स्थानिक ग्रामस्थांच्या सुमधुर भजनांनी वातावरण भक्तिरसाने न्हाऊन निघाले.

रविवार, १५ फेब्रुवारी रोजी मुख्य वर्धापन दिन सोहळा पार पडला. दुपारी १ वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ‘२० x २०’ भजनांचा जंगी सामना रंगला. कोकण व मुंबईतील नामवंत भजनी बुवा सुयश मुरारी काराणे (भांडुप) आणि गणेश मनोहर जांभळे (बांद्रा) यांनी डबलबारी भजन सादर करत भक्ती आणि कलेचा सुरेल संगम घडवला.

सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पालशेत, वेळणेश्वर आणि नरवण येथील भजन मंडळांनी देवीचा महिमा गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
मंदिराची गाभाऱ्यापासून घुमटापर्यंत आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई गुरव परिवार, कर्दे यांच्या हस्ते करण्यात आली होती, ज्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. मुंबई, पुणे तसेच विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. विशेषतः माहेरवाशिणींच्या उपस्थितीने उत्सवाला वेगळीच शोभा प्राप्त झाली.

मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी देवीला गार्हाणे घालून देवांच्या रूपांचे अवतरण करण्यात आले आणि मंगलमय वातावरणात प्रथम वर्धापन दिनाची सांगता झाली.

देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मोहन यशवंत गडदे यांनी सर्व भाविक, सहकार्यकर्ते आणि ग्रामस्थांचे आभार मानत हा सोहळा भविष्यात अधिक भव्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा

पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा पुणे (गुरुदत्त वाकदेकर): आत्मसिद्ध मिशन आणि विश्व मराठी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने...
Read More
पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६- कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६- कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार नाशिक (गुरुदत्त वाकदेकर): कलावंत विचार मंच,...
Read More
नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६-  कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार

लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय ‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार

लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय 'ब्लॅक बेल्ट' परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या यशाने लांजाचा नावलौकिक; ७...
Read More
लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय ‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार

राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश

■ राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश ■ अध्याप चौकशी न...
Read More
राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश

टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय

टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे...
Read More
टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय

पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय

पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): राजीव गांधी आंतरराष्ट्रीय...
Read More
पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय

पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ

*पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ *२६वे कविसंमेलन दादरमध्ये भावपूर्ण वातावरणात संपन्न* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :...
Read More
पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ

जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

‘जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा ८० केंद्रीय कायद्यांतील १००० हून अधिक गुन्हे डिक्रिमिनलाइज;...
Read More
जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) वयाची...
Read More
सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय

जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२६ च्या ९व्या...
Read More
जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय