काजुर्ली खडपेवाडी ग्रामस्थांतर्फे महेश नाटेकर, सुचिता घाणेकर-गोताड यांचा सत्कार 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

काजुर्ली खडपेवाडी ग्रामस्थांतर्फे महेश नाटेकर, सुचिता घाणेकर-गोताड यांचा सत्कार 

आबलोली

गुहागर तालुक्यातील काजुर्ली खडपेवाडी ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद पडवे गट सदस्य महेश नाटेकर आणि पंचायत समिती पाचेरी सडा गण सदस्य श्रीमती सुचिता घाणेकर-गोताड यांचा सत्कार करण्यात आला.

निवडणूक कालावधीत महेश नाटेकर यांनी वाडीतील ग्रामस्थांना भेटून रस्त्या संदर्भातल्या समस्या जाणून घेतल्या होत्या आणि त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर अभिनंदन करण्यासाठी वाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महेश नाटेकर यांचा सत्कार वाडीतील ज्येष्ठ सदस्य प्रकाश पवार तर सुचिता घाणेकर-गोताड यांचा सत्कार सुहासिनी पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर आनंद जोशी, ज्येष्ठ शिवसैनिक विजय वैद्य, काजुर्ली गावचे उपसरपंच सुधाकर गोणबरे, युवा कार्यकर्ते विशाल गोताड, अजित जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने अमोल पवार यांनी नादुरुस्त रस्ता, दूर अंतरावर असलेल्या विद्युत डीपी मुळे निर्माण होणाऱ्या समस्या यांविषयी माहिती दिली. डॉक्टर आनंद जोशी यांनी तोंडली पिलवली ते काजुर्ली खडपेवाडी यांना जोडणारा खाडीपूल, मान आडीवाडी खडपेवाडी मळेवाडी कुंभारमाळा ते पांढरी पायर यांना जोडणाऱ्या रस्त्या संदर्भात विचार मांडले.

सत्काराला उत्तर देताना महेश नाटेकर यांनी मानवाडी ते खडपे- तेलीवाडी यांना जोडणारा रस्ता आणि त्यातील कठीण चढ-उतार यावर्षी पावसाळ्यापूर्वी काढून रस्ता सुस्थितीत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. वाडीतील मतदारांनी केलेल्या सहकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आपण सदैव या वाडीच्या विकासासाठी बांधील राहू असे आश्वासन दिले. सुचिता घाणेकर- गोताड यांनीही वाडीतील ग्रामस्थांचे आभार मानतानाच होळीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.अमोल पवार यांनी केले. यावेळी विनायक पवार, प्रकाश पवार, रघुनाथ पवार, संतोष पवार, सुभाष पवार, प्रमोद पवार, यशवंत पवार, अजित जोशी यांसह वाडीतील स्थानिक व मुंबईतील ग्रामस्थ, महिला मंडळ उपस्थित होते.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा गुहागर विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, बँड पथकाच्या तालावर स्वागत; मान्यवरांच्या...
Read More
श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम

चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम राजापूर-राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवेली कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी गावातील ग्रामस्थांची...
Read More
चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम राजापूर/पन्हळे :- शाळेच्या पहिल्याच दिवशी, दि....
Read More
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi ▶️ OYNA Содержимое Təhlükəsiz Oyun Ola Bilərsiniz: Pinco Online Kazino...
Read More

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल - आम. शेखर निकम यांचा विश्वास आबलोली (संदेश कदम) कोकण हा पहाडांचा प्रदेश...
Read More
सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत जून अर्ध्यावर तरी पावसाची प्रतीक्षा कायम; दुबार पेरणीचे संकट आणि पाणीटंचाईची...
Read More
संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत

ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली

⚠️ ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली रिओ डी जानेरोतील Recreio dos Bandeirantes परिसरात...
Read More
ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी “एक बाठ, एक आशा” संकल्पनेतून...
Read More
कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेचा अंदाज : मान्सूनची वाटचाल मंदावली; राज्यात व्यापक पावसासाठी...
Read More
एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव

कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव   तीन दशकांहून अधिक काळ भजन परंपरा जपणाऱ्या कलाकाराच्या...
Read More
कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव