मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अर्थसंकल्प समजण्यासाठी मार्गदर्शक पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अर्थसंकल्प समजण्यासाठी मार्गदर्शक पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : येत्या ६ मार्च रोजी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस वर्ष २०२६–२०२७ या आर्थिक वर्षासाठी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सर्वसामान्यांना सहज समजावा, या उद्देशाने त्यांनी लिहिलेले ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. नागरिकांना अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.

राज्याच्या आर्थिक धोरणांचा आराखडा असलेला अर्थसंकल्प सामान्य वाचकांपर्यंत पोहोचावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ४ मार्च २०२० रोजी नागपूर येथील लाखे प्रकाशन यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. तेव्हापासून अर्थसंकल्प समजावून सांगणारे सोपे मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाची ओळख आहे.

‘बजेट’ शब्दाची उत्पत्ती, अर्थसंकल्प समजण्यापूर्वी आवश्यक बाबी आणि अर्थसंकल्प विषयक संज्ञांचे स्पष्टीकरण पुस्तकात देण्यात आले आहे. मराठी व इंग्रजी शब्दप्रयोगांची तुलना स्पष्ट केली आहे. भारतीय संविधानातील संबंधित तरतुदींचा उल्लेख आहे. अर्थसंकल्पाची रचना, तो तयार होण्याची प्रक्रिया आणि मंजुरीची पायरीवार माहितीही समाविष्ट आहे.

पांढऱ्या मुखपृष्ठाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक, म्हणजेच व्हाईट बुक, तसेच ग्रीन बुकमधील तरतुदींचे सोप्या भाषेत विश्लेषण करण्यात आले आहे. विभागनिहाय व विकास मंडळनिहाय अनिवार्य विकास खर्चाची माहिती दिली आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७१ (२) (ब) नुसार प्रादेशिक अनुशेष निर्मूलनासाठी सादर होणाऱ्या अनुपालन आदेशाचाही ऊहापोह केला आहे. अर्थसंकल्प सादर करणे, मंजूर करणे आणि त्याचे कायद्यात रूपांतर होणे या टप्प्यांचेही स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक https://www.devendrafadnavis.in/budget_2020
या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध आहे. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच त्याची रूपरेषा समजून घेण्याची ही संधी आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयाने ही माहिती प्रसिद्धीस दिली आहे. नागरिकांनी या पुस्तकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मोगरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा : कुमारी श्रुतिका शेमणकरच उज्ज्वल यश

मोगरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा : कुमारी श्रुतिका शेमणकरच उज्ज्वल यश मुंबई - संदीप शेमणकर मोगरे गावासाठी अभिमानाची बाब ठरावी...
Read More
मोगरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा : कुमारी श्रुतिका शेमणकरच उज्ज्वल यश

गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन ग्रामस्थां मध्ये घबराट

गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन ग्रामस्थां मध्ये घबराट आबलोली (संदेश कदम) जंगल मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने वन्य प्राणी...
Read More
गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन ग्रामस्थां मध्ये घबराट

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वानंदी सरदेसाईचा विवाह; नवरा कोण? उत्सुकतेला मिळाला पूर्णविराम

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वानंदी सरदेसाईचा विवाह; नवरा कोण? उत्सुकतेला मिळाला पूर्णविराम नाट्यविश्वातून जुळली ओळख; दिग्दर्शक-विक्रमशील कलाकार विक्रांत बदरखे यांच्यासोबत आयुष्याची...
Read More
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वानंदी सरदेसाईचा विवाह; नवरा कोण? उत्सुकतेला मिळाला पूर्णविराम

संगमेश्वरची लेक ठरली महाराष्ट्राची लाडकी! तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ ची महाविजेती

संगमेश्वरची लेक ठरली महाराष्ट्राची लाडकी! तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६' ची महाविजेती साखरपा गावामध्ये जल्लोष; अभिनेता राकेश बापट ठरला...
Read More
संगमेश्वरची लेक ठरली महाराष्ट्राची लाडकी! तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी ६’ ची महाविजेती

आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती...
Read More
आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ जिल्हा पालघर यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

रत्नागिरीत POCSO अंतर्गत आरोपीला शिक्षा; महिला अत्याचार प्रकरणांत वाढतोय न्यायाचा दर

रत्नागिरीत POCSO अंतर्गत आरोपीला शिक्षा; महिला अत्याचार प्रकरणांत वाढतोय न्यायाचा दर तीन वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार दंड; राज्यभरात महिला...
Read More
रत्नागिरीत POCSO अंतर्गत आरोपीला शिक्षा; महिला अत्याचार प्रकरणांत वाढतोय न्यायाचा दर

लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष

लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष नवीमुंबई (मंगेश जाधव)बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेणारा...
Read More
लोढाहेवन-निळजे दुमदुमले: सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्वागत, ‘विचारांचे खरे वारसदार’ म्हणत जनतेचा जयघोष

BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड

BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)-शिवसेना पक्षाची बांधणी युद्धपातळीवर सुरु असून याचाच...
Read More
BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड

 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार 

 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार  रत्नागिरी - जि .प आदर्श...
Read More
 जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करणार 

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): सेवा मंडळ एज्युकेशन...