कै. दत्तात्रय बिवलकर गुरुजी स्मरणार्थ जि. प. प्राथमिक शाळा वाटद रायवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कै. दत्तात्रय बिवलकर गुरुजी स्मरणार्थ जि. प. प्राथमिक शाळा वाटद रायवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे

जि. प. प्राथमिक शाळा वाटद रायवाडी, ता. जि. रत्नागिरी येथे सन २०२५–२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांमुळे शाळेचा परिसर उत्सवमय झाला होता.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाटिका, भाषणे आदी सादर करून आपली कला व आत्मविश्वासाचा उत्कृष्ट परिचय करून दिला. विशेष आकर्षण ठरलेल्या छोट्या मुलांच्या बहुरंगी नमनाने उपस्थितांची मने जिंकली. विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सायंकाळी ७.०० वाजता पार पडला.
यावेळी कै. दत्तात्रय बिवलकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या कार्याची कृतज्ञतापूर्वक आठवण ठेवत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बिवलकर गुरुजी यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर उत्तम संस्कार, शिस्त आणि प्रामाणिकपणाची शिकवण दिली. त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना घडवून समाजात आदर्श नागरिक म्हणून उभे केले.
या प्रसंगी त्यांच्या कार्याला उजाळा देताना पुढील ओळी सादर करण्यात आल्या —
“लहानपणीचे ज्ञान अमोल ठेवा,
संस्कारांची बीजे मनात रुजवा;
त्या पायावर उभा राहतो भवितव्य,
घडतो विद्यार्थी तेजस्वी, सक्षम आणि ध्येयवेडा.”
मी स्वतःही बिवलकर गुरुजींचा माजी विद्यार्थी असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात योग्य दिशा मिलाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका व सहशिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष बारगुडे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच पाचीवाडीतील ग्रामस्थ, पालक व महिला वर्ग यांची मोलाची साथ लाभल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा गुहागर विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, बँड पथकाच्या तालावर स्वागत; मान्यवरांच्या...
Read More
श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम

चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम राजापूर-राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवेली कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी गावातील ग्रामस्थांची...
Read More
चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम राजापूर/पन्हळे :- शाळेच्या पहिल्याच दिवशी, दि....
Read More
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi ▶️ OYNA Содержимое Təhlükəsiz Oyun Ola Bilərsiniz: Pinco Online Kazino...
Read More

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल - आम. शेखर निकम यांचा विश्वास आबलोली (संदेश कदम) कोकण हा पहाडांचा प्रदेश...
Read More
सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत जून अर्ध्यावर तरी पावसाची प्रतीक्षा कायम; दुबार पेरणीचे संकट आणि पाणीटंचाईची...
Read More
संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत

ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली

⚠️ ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली रिओ डी जानेरोतील Recreio dos Bandeirantes परिसरात...
Read More
ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी “एक बाठ, एक आशा” संकल्पनेतून...
Read More
कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेचा अंदाज : मान्सूनची वाटचाल मंदावली; राज्यात व्यापक पावसासाठी...
Read More
एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव

कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव   तीन दशकांहून अधिक काळ भजन परंपरा जपणाऱ्या कलाकाराच्या...
Read More
कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव