रत्नागिरीत चाकू हल्ला; मिरकरवाडा जेटीजवळ व्यक्तीवर सपासप वार, एक गंभीर जखमी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

📰  रत्नागिरीत चाकू हल्ला; मिरकरवाडा जेटीजवळ व्यक्तीवर सपासप वार, एक गंभीर जखमी

🔹 : शिमगोत्सवातील किरकोळ वादाचा राग; तिघांविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू

रत्नागिरी : शिमगोत्सवाच्या वेळी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून तिघांनी एका व्यक्तीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ७) सकाळी सुमारे ११ वाजता मिरकरवाडा जेटीच्या पहिल्या गेटजवळ घडली. या हल्ल्यात जयेंद्र दत्ताराम नार्वेकर (वय ५५, रा. भाटिमिऱ्या, रत्नागिरी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शशांक सावंत, संजू आणि रुपेश सावंत उर्फ छोटा भाई (तिघेही रा. सडामिऱ्या, रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तक्रारीनुसार, रविवारी (१ मार्च) रात्री सुमारे १० वाजता शिमगोत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी पालखी येणार असल्याने भाटिमिऱ्या येथील दत्त मंदिर परिसरात रस्त्यावर मंडप उभारणे आणि रांगोळी काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी तीन मुली दुचाकीवरून जात असताना त्यांच्या वाहनाचा धक्का मंडपाचे काम करणाऱ्या फिर्यादींच्या भाचा विरेंद्र किरला याला लागला. या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. त्या वेळी एका मुलीने सडामिऱ्या गावातील लोकांना बोलावण्याची धमकी दिली.

 

काही वेळात शशांक सावंत, संजू आणि इतर काही जण तेथे आले. त्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र जयेंद्र नार्वेकर, रुपेश कमलाकर सावंत, मनोज सावंत, परेश सावंत आणि परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. त्यामुळे त्या वेळी शहर पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार नोंद झाली नव्हती.

 

दरम्यान, शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजता जयेंद्र नार्वेकर हे त्यांच्या दुचाकीने (एमएच-०८-बीएफ-२३२३) मिरकरवाडा जेटीकडे बोटीचे काम पाहण्यासाठी जात होते. ते जेटीच्या पहिल्या गेटजवळ पोहोचताच संशयित शशांक सावंत आणि संजू यांनी आपली दुचाकी त्यांच्या वाहनासमोर आडवी लावली. त्यानंतर दोघांनी त्यांना शिवीगाळ करत चाकूने पाठीवर तसेच हात व खांद्यावर वार केले. गंभीर जखमी झाल्याने नार्वेकर खाली कोसळले.

 

याचवेळी रुपेश सावंत उर्फ छोटा भाई हा दुचाकीवरून तेथे आला आणि त्यानेही नार्वेकर यांच्या पाठीवर चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार पाहून घटनास्थळी लोकांची गर्दी वाढू लागल्याने तिघेही संशयित तेथून पळून गेले.

 

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका दुचाकीस्वाराला नार्वेकर यांनी आपल्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याची विनंती केली. त्याचवेळी राहुल नावाचा ओळखीचा व्यक्ती तेथे आल्याने दोघांनी मिळून नार्वेकर यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले.

 

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामूनी, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने गोळा केले असून या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिसांकडून सुरू आह

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा गुहागर विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, बँड पथकाच्या तालावर स्वागत; मान्यवरांच्या...
Read More
श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम

चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम राजापूर-राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवेली कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी गावातील ग्रामस्थांची...
Read More
चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम राजापूर/पन्हळे :- शाळेच्या पहिल्याच दिवशी, दि....
Read More
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi ▶️ OYNA Содержимое Təhlükəsiz Oyun Ola Bilərsiniz: Pinco Online Kazino...
Read More

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल - आम. शेखर निकम यांचा विश्वास आबलोली (संदेश कदम) कोकण हा पहाडांचा प्रदेश...
Read More
सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत जून अर्ध्यावर तरी पावसाची प्रतीक्षा कायम; दुबार पेरणीचे संकट आणि पाणीटंचाईची...
Read More
संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत

ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली

⚠️ ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली रिओ डी जानेरोतील Recreio dos Bandeirantes परिसरात...
Read More
ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी “एक बाठ, एक आशा” संकल्पनेतून...
Read More
कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेचा अंदाज : मान्सूनची वाटचाल मंदावली; राज्यात व्यापक पावसासाठी...
Read More
एल निनोचा मान्सूनवर परिणाम; महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव

कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव   तीन दशकांहून अधिक काळ भजन परंपरा जपणाऱ्या कलाकाराच्या...
Read More
कोंडकारूळचे भजनी कलावंत विश्वास पावसकर यांचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे गौरव