गुहागर तालुक्यातील असोरे येथील लुंबिनी बुद्धविहारात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
तळवली (मंगेश जाधव)
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मुक्काम पोस्ट असोरे येथील लुंबिनी बुद्धविहारात नुकताच जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील महिलांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील व बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली. त्यानंतर शेवंती सुर्वे, रेवती सुर्वे, माधवी सुर्वे आणि ममता सुर्वे या मान्यवर महिलांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्ध, क्रांतिज्योती माता सावित्रीमाई फुले आणि माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद एकता सुर्वे यांनी भूषविले. तसेच राजवर्धनी माने, पल्लवी सुर्वे आणि कस्तुरी सुर्वे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करत महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले.
या संपूर्ण उपक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली सुर्वे यांनी केले. या प्रसंगी गावातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. शेवटी सर्व उपस्थितीताचे आभार मानण्यात आले













